आटोळा येथील एका मुस्लिम कुटुंबाच्या घरी महालक्ष्मी अवतरल्या आहेत. Pudhari Photo
लातूर

मुस्लिम कुटुंबाच्या घरी अवतरल्या महालक्ष्मी

पुढारी वृत्तसेवा
संग्राम वाघमारे

चाकूर: तालुक्यातील आटोळा येथील एका मुस्लिम कुटुंबाच्या घरी महालक्ष्मी अवतरल्या असून त्यांनी लक्ष्मीची स्थापना करून सामाजिक सलोखा जपला आहे. या रूपाने पटेल कुटुंबानी एकतेचे दर्शनही घडवले आहे. (Ganeshotsav 2024)

आटोळा येथील रहिवाशी अल्लाउद्दीन पटेल यांना एके दिवशी शेताकडे शेळ्या राखत असताना एका तळ्याच्या शेजारी जुन्या लक्ष्मीच्या मूर्ती सापडल्या होत्या. त्यांनी त्या आदरपूर्वक घरी आणल्या आणि त्यांची विधिवत पूजा केली व गौरी पुजनादिनी नवीन लक्ष्मींचे मुखवटयांची प्रतिष्ठापणा केली. सापडलेल्या गौरी मुखवट्यांचीही पुजा केली. त्यांच्या समोर प्रथेप्रमाणे फराळ ठेवला. खेळण्यांची आरास मांडली. पूजन केले पुरणपोळींचा नैवेद्य दाखवला.

महादेव पार्वतीची प्रतिमा त्यांनी बसवल्या. दोन दिवस लक्ष्मीचा सण त्यांच्या परिवाराने उत्साहात साजरा केला. पटेल कुटुंबाच्या या अनोख्या सामाजिक उपक्रमाचे तालुक्यात कौतुक व स्वागत होत आहे. अल्लाउद्दीन पटेल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, आणि कुटुंबीय या धार्मिक सणामध्ये उत्साहाने सहभागी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT