Latur Crime News : कुंडली दोष दूर करण्याच्या नावाखाली मुलीवर अत्याचार file photo
लातूर

Latur Crime News : कुंडली दोष दूर करण्याच्या नावाखाली मुलीवर अत्याचार

कुंडलीतील दोष दूर करण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर शहरात उघडकीस आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Girl sexually assaulted under the pretext of removing astrological defects (Kundali dosh)

लातूर : पुढारी वृत्तसेवा कुंडलीतील दोष दूर करण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर शहरात उघडकीस आला आहे. महाराज म्हणून वावरणाऱ्या भोंदूबाबाने मुलीच्या पत्रिकेत कुंडली दोष असल्याचे सांगून तो दूर करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर पूजा करण्याच्या बहाण्याने मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात 'पोक्सो' सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर हनुमंतराव रामदासी (४४, रा. लातूर) असे आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतले असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली. अंधश्रद्धेचा आधार घेत करण्यात आलेल्या अत्याचाराबाबत शहरात संताप व्यक्त होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT