Gadkari reviews under-construction highway projects
लातूर, पुढारी वृतसेवा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी (दि.१०) लातूर येथील विमातळाच्या बैठक कक्षात लातूर जिल्ह्यातील निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्ग प्रक्लपांचा लोकप्रतिनिधीं व अधिकाऱ्यांसह आढावा घेतला. विशेष म्हणजे लातूर- टेंभुर्णी रस्ता व कामांबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्याकरवी विस्ताराने त्यांनी माहिती घेतली. या मार्गातील तांत्रिक अडचणीही जाणून घेत त्या दूर करण्यासंदर्भातही चर्चा केली.
लातूर शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून पूर्वीचे वळण रस्ते आता शहरात आले आहेत. या रस्त्यापलीकडे शहर मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. पर्यायी मार्ग नसल्याने अवजड वाहने शहराता येत असून त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. अपघातांची संख्याही वाढली आहे.
हे वास्तव लक्षात घेता लातूर शहरासाठी नवीन वळण रस्ता अत्यंत गरजेचा असून तो मंजूर करावा, अशी अपेक्षा लातूर जिल्ह्यातील तेथे उपस्थित लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याबाबतही गडकरी यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतले व या नियोजीत वळण रसत्याच्या मागणीबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शवली. यावेळी आ. संजय बनसोडे, प्रेरणा होनराव उपस्थित होत्या.