उदगीर : पुढारी वृत्तसेवा
उदगीर शहरातील जळकोट परिसरातील कासीमपुरा भागात जादुटोण्याची भिती दाखवून ३४ लाखांची फसवणूक केल्याचे समेार आले आहे. या फसवणूक प्रकरणी महाराष्ट्र नरबळी, अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादु टोणा यांना प्रतिबंध घालणे कायद्यांतर्गत उदगीर शहर पोलिस स्टेशनमध्ये १९ एप्रिल रोजी सुरया वाजीद मुंजेवार रा. जळकोट रोड उदगीर, फरीदा युसुफ शेख रा. हैदराबाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अस्मतुन्नीसा जब्बारोदीन परकोटे (वय ५८ वर्ष) व्यवसाय घरकाम रा. कासीमपुरा जळकोट उदगीर यांच्याकडे दिनांक ७ सप्टेंबर २०२२ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत संशयित आरोपी सुरया वाजीद मुंजेवार रा. जळकोट रोड उदगीर, फरीदा युसुफ शेख रा. हैदराबाद यांनी संगनमताने वेळोवळी घरी येवुन तुमच्या घरावर करणी केलेली आहे. काळी जादु केलेली आहे. तुमच्या कुंटुबावर संकट आहे. ते आम्ही दूर करतो असे सांगुन भीती निर्माण केली. घरातल्यांचा विश्वास बसल्यानंतर घरातील अंगणात जादु टोण्याचे विधी केले. काही तरी पुरुण वेळोवेळी फिर्यादीकडून फिर्यादीचे व तिच्या मुलीचे, सुनेचे सोन्याचे, चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकुण ३३ लाख ९० हजार रुपये काढून घेत फसवणूक केली.
या फसवणुकीप्रकरणी सुरया वाजीद मुंजेवार रा. जळकोट रोड उदगीर व फरीदा युसुफ शेख रा. हैद्राबाद यांच्या विरोधात उदगीर शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उदगीर पोलिसस्टेशनचे पोलिस निरिक्षक दिलिप गाडे करित आहेत.