Latur Crime News : चार सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी हद्दपार File Photo
लातूर

Latur Crime News : चार सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी हद्दपार

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गांधी चौक पोलिसांनी चार गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Four habitual offenders externed for one year

लातूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गांधी चौक पोलिसांनी चार गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी या चौघांना एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सराईत गुन्हेगार, दहशत निर्माण करणारे तसेच वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत गांधी चौक पोलिस ठाणे व लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने हद्दपारीचे प्रस्ताव सादर केले होते.

सखोल चौकशीनंतर संबंधित व्यक्तींविरुद्ध दाखल असलेले गंभीर गुन्हे, गुन्ह्यांची वारंवारिता, नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती, गोपनीय साक्षीदारांचे जबाब तसेच पूर्वी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही वर्तनात सुधारणा न झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार महादेव दिलीप सन्मुखराव (रा. राजीव नगर, बाभळगाव चौक) आणि महेश ताजू कांबळे (रा. आनंदनगर) यांना लातूर जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव व कळंब तालुका तसेच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तर रेहान अरिफ ऊर्फ अरेफ कुरेशी (रा. भोई गल्ली, कुरेशी मोहल्ला)

आणि पृथ्वीराज ऊर्फ अण्णा भास्कर माने (रा. मंठाळे नगर) यांना लातूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. चौकशीत संबंधित आरोपींविरुद्ध मानवी शरीराविरुद्धचे गुन्हे, मारहाण, धमकी, दहशत निर्माण करणे, सार्वजनिक शांततेस बाधा पोहोचविणे आणि परिसरात भयाचे वातावरण निर्माण करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. विविध पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हे नोंद असून, प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही त्यांच्या वर्तनात अपेक्षित सुधारणा झालेली नव्हती. आदेशानुसार संबंधितांना एक वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले असून आदेश प्राप्त झाल्यानंतर २४ तासांच्या आत

निर्धारित क्षेत्र सोडणे बंधनकारक आहे. हद्दपारीच्या कालावधीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय संबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड, उपनिरीक्षक गणेश चित्ते, प्रमोद देशमुख तसेच पोलिस अंमलदार राजेंद्र टेकाळे, संतोष गिरी, रवीसन जाधव, आर. बी. गवारे, सचिन चंद्रपाटले, शिवा भाडुळे आणि गोविंद राऊत यांनी केली. लातूर पोलिसांकडून सराईत गुन्हेगार व सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींविरुद्ध अशा प्रतिबंधात्मक कारवाया यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT