Latur news : 'साहेब, जनावरांना चारा-पाणी नाही; जगायचे कसे ?' file photo
लातूर

Latur news : 'साहेब, जनावरांना चारा-पाणी नाही; जगायचे कसे ?'

दुष्काळाच्या झळांनी शेतकरी हतबल; पालकमंत्र्यांकडून मदतीचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

Farmers desperate due to drought; An assurance of help from the Guardian Minister

चाकूर, पुढारी वृत्तसेवा: पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने चाकूर तालुक्यातील खरीप पिके करपली असून, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी मोहदळ येथे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासमोर व्यथा मांडल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी चारा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

पालकमंत्री भोसले आणि शनिवारी शिवेंद्रसिंहराजे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी मोहदळ येथे पावसाअभावी नुकसान झालेल्या सोयाबीनसह अन्य खरीप पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना जनावरांना चारा-पाणी मिळत नसल्याची व्यथा मांडण्यात आली. साहेब, जनावरांना चारा-पाणी नाही, खायला ज्वारी नाही, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपली परिस्थिती सांगितली. जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी उसाचा पर्याय तपासण्यात येत असून, स्थानिक पातळीवर चारा कमी पडल्यास परराज्यांतून चारा आणण्याबाबत उपाययोजना करण्यात येतील, असे पालकमंत्री भोसले यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये, सरकार त्यांच्या पाठीशी असून चारा व पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यावर भर दिला जात असल्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील तळेगावकर, उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, उपसभापती भुजंग शिंदे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, दिलीपराव देशमुख आणि उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT