Latur Accident : खासगी बस उलटून अकरा प्रवासी जखमी file photo
लातूर

Latur Accident : खासगी बस उलटून अकरा प्रवासी जखमी

कराड येथून साखरपुडा आटोपून परतणाऱ्या कुटुंबाच्या बसला अपघात

पुढारी वृत्तसेवा

Eleven passengers injured after private bus overturns

भारत सवने

परतूर : सातारा जिल्ह्यातील कराड येथुन साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपुन बुलढाणा जिल्ह्याकडे जाणाऱ्या नातेवाईकांची खासगी बस परतुर-वाटुर रस्त्याोवरील रोहीणा गावाजवळ उलटुन झालेल्या अपघातात बस मधील ११ प्रवासी जखमी झाले. रविवारी सकाळी हा अपघात झाला.

बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव (ता. मेहकर) येथील रहिवासी सुभाष तुळशीराम पळसकर (वय ७० वर्ष) यांचा नातू सागर नितीन पळसकर याचा साखरपुड्याचा कार्यक्रम कराड (जि. सातारा) येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम आटोपून सर्व नातेवाईक मिनी बस (क्रमांकः एपी ०५- २९२६) ने डोणगाव येथे परत जात असतांना सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास वाटूर-परतूर रोडवरील रोहिणा गावाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही मिनी बस रस्त्याच्या कडेला उलटली.

बस उलटल्यानंतर बसच्या काचा व प्रवाशांचे सामान रस्त्यावर पडले होते.. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. या अपघातामध्ये बसमधील ११ प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. सर्व जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय, परतूर येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या अपघातात समिक्षा रुपेश पळसकर (वय १८ वर्ष), सारीका अनुप पळसकर (वय ३० वर्ष), पल्लवी वैभव शिंगणे (वय २८ वर्ष), नम्रता दिपक पळसकर (वय २० वर्ष), सई विकास पळसकर (वय १३ वर्ष), सात्विक विशाल पळसकर (वय ७ वर्ष), चैताली सचिन पळसकर, (व १० वर्ष) दिपक वंसतराव पळसक (वय ३५ वर्ष), दिक्षा दिपक पळसक (वय ३५ वर्ष) (सर्व रा. डोणगाव, ता मेहकर, जि. बुलढाणा) माधव न्यानक वानखेडे (वय ३५ वर्ष,) (रा. अंचळ, व रिसोड, जि. वाशिम) वैभव शिवाज शिंगणे (वय ३४ वर्ष, रा. देवळगाव महि ता. देवळगाव राजा, जि. बुलढाण यांचा जखमीमधे समावेश आहे. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघाताची माहिती

अपघातातबाबत सुभाष तुळशीराम पळसकर यांनी परतूर पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, पोलिसांनी या रस्ते अपघाताची नोंद केली आहे. या घटनेचा तपास जमादार जनार्धन पालवे हे करत आहेत. अपघातानंतर काही काळ या रस्त्यावर वाहने व गर्दी झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसुन आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT