Ramadan Eid : एकोपा, शांती, समृद्धीसाठी अल्लाहकडे दुआ  file photo
लातूर

Ramadan Eid : एकोपा, शांती, समृद्धीसाठी अल्लाहकडे दुआ

अहमदपूर तालुक्यात ईद-उल-फित्र उत्साहात साजरी

पुढारी वृत्तसेवा

Eid-ul-Fitr Celebrated with Enthusiasm in Ahmadpur Taluka

अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा : शहर व तालुक्यात मुस्लिम बांधवांनी शनिवारी ईद-उल-फित्र मोठ्या उत्साहात साजरी केली. ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्र येत ईद-उल-फित्रची सामूहिक नमाज अदा करून एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक एकोपा, शांती, समृद्धीसाठी अल्लाहकडे दुआ मागितली.

ईदगाह मैदानावर सकाळी ९:३० फाजीलसाब वाजता मौलाना मुफ्ती मुहम्मद फाजीलसाब यांच्या नेतृत्वात सामूहिक नमाज अदा केली. यावेळी मौलाना मुफ्ती मुहम्मद फाज यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी, जागतिक शांततेसाठी, अमन व भाईचाऱ्यासाठी अल्लाहकडे दुआ मागितली.

तत्पूर्वी मौलाना मुफ्ती मुहम्मद फाजीलसाब यांचे बयाण झाले. माणूस म्हणून जगण्याची संधी दे, अल्लाह आम्हाला सबुद्धी दे, अशीही प्रार्थना त्यांनी अल्लाहकडे केली. शुभेच्छा देण्यासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी आ. बब्रूवान खंदाडे, शिवानंद हेंगणे, भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले, पोलिस निरिक्षक विनोद मेत्रेवार, तहसीलदार उज्ज्वला पांगरकर, पोउनि. आनंद श्रीमंगले आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT