प्रातिनिधिक छायाचित्र. pudhari photo
लातूर

NEET Paper Leak Scandal : लातुरातील डॉक्टर सीबीआयच्या ताब्यात

नीट प्रकरणात सहा डॉक्टर पुत्रांना पेपर दिल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Doctor from Latur taken into CBI custody

लातूर, पुढारी वृतसेवा : नीट पेपरफुटी प्रकरणात लातुरातील एका डॉक्टरला सीबीआयने चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे. या डॉक्टरच्या औसा रोडवर असलेल्या निवासस्थानी सहा विद्यार्थ्यांना पेपर देण्यात आले होते, अशी माहिती आहे.

बालरोगतज्ज्ञ असलेल्या या डॉक्टरला

सीबीआयने चौकशीसाठी बुधवारी बोलाविले होते. चौकशी केल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले असून, अटकेची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. या डॉक्टरच्या घरी प्रा. कुलकर्णी यांनी सहा विद्यार्थ्यांना पेपर दिले होते, असे तपासात पुढे आले आहे. मंगळवारी सीबीआयने त्याच्या घरातून काही कागदपत्रे हस्तगत केली.

होती. दरम्यान, बुधवारी त्या डॉक्टराला पुणे येथे सीबीआयने बोलावले होते. ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या, त्या सर्व मुलांचे पालक हे डॉक्टर असल्याचे समजते. लातूर येथील प्रा. कुलकर्णी तसेच शिवराज मोटेगावकर यांच्याशी या डॉक्टरचा असलेला संबंध पडताळून पाहिल्या जात आहे.

आठ प्लॉट मोटेगावकरचे

लातूर शहरातील मध्यवर्ती भागात आठ प्लॉट मोटेगावकर कुटुंबीयांच्या नावे असल्याचा आरोप माहिती अधिकार मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी केला आहे. साडेसहा कोटींची मालमत्ता केवळ पावती तिकिटावर खरेदी केल्याचे ते म्हणाले. शहरातील हा भाग उद्योग भवनसाठी हस्तांतरित वा विक्री होत नाही. परंतु मोटेगावकरने या ठिकाणी आठ प्लॉट खरेदी केले. बेकायदेशीर भूखंडाला मनपा आणि शासकीय पातळीवर संरक्षण मिळाल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT