लातूर, पुढारी वृत्तसेवाः पोलीस, एटीएस आणि ईडी अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लातूरमधील ६६ वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याची २८ लाख ५१ हजार ୧୧୧ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लातूर पोलिसांच्या सायबर पथकाने सहा आरोपींना अटक केली आहे. मध्य प्रदेश, दिल्ली आणि हरियाणा येथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
लातूर येथील एका ६६ वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याला अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधून आपण पोलीस, एटीएस आणि ईडीचे अधिकारी असल्याचे सांगितले. फिर्यादी यांचा १२२ कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभाग असून त्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा बनाव करण्यात आला. या प्रकरणात अटक होऊन कारावास भोगावा लागेल, तसेच बदनामी होईल, अशी भीती दाखवून त्यांना मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँक खात्यातील रकमेची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. यासाठी ईडीच्या नावाने बनावट पत्रही पाठविण्यात आले. या धमकीला व खोट्या आश्वासनांना बळी पडून फिर्यादी यांनी विविध बँक खात्यांमध्ये एकूण २८ लाख ५१ हजार ९९९ रुपये हस्तांतरित केले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि आर्थिक व्यवहारांची साखळी तपासून सहा आरोपींना अटक केली. त्यामध्ये अमित शिवनारायण दुबे (वय ४०), अनुराग गणेशदत्ता मिश्रा (वय २७), शिवम माधवसिंह ठाकूर (वय २४, तिघे रा. मध्य प्रदेश), अंकित मानसिंग यादव (वय ३२), कुनालसिंग नरेंद्रसिंग रावत (वय ३०, दोघे रा. दिल्ली) आणि शिवकुमार नरेंद्रसिंग (वय ३०, रा. गुरुग्राम, हरियाणा) यांचा समावेश आहे. याप्रकरणी लातूर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सहभाग असून त्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा बनाव करण्यात आला. या प्रकरणात अटक होऊन कारावास भोगावा लागेल, तसेच बदनामी होईल, अशी भीती दाखवून त्यांना मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँक खात्यातील रकमेची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. यासाठी ईडीच्या नावाने बनावट पत्रही पाठविण्यात आले. या धमकीला व खोट्या आश्वासनांना बळी पडून फिर्यादी यांनी विविध बँक खात्यांमध्ये एकूण २८ लाख ५१ हजार ९९९ रुपये हस्तांतरित केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली.
सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि आर्थिक व्यवहारांची साखळी तपासून सहा आरोपींना अटक केली. त्यामध्ये अमित शिवनारायण दुबे (वय ४०), अनुराग गणेशदत्ता मिश्रा (वय २७), शिवम माधवसिंह ठाकूर (वय २४, तिघे रा. मध्य प्रदेश), अंकित मानसिंग यादव (वय ३२), कुनालसिंग नरेंद्रसिंग रावत (वय ३०, दोघे रा. दिल्ली) आणि शिवकुमार नरेंद्रसिंग (वय ३०, रा. गुरुग्राम, हरियाणा) यांचा समावेश आहे. याप्रकरणी लातूर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सायबर पथकाची कारवाई
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगिरे, पोलीस अंमलदार विकास नळेगावकर, गफार मिर्झा, विजय खारटमोल, अविनाश मरलापल्ले, रवि जाधव, सुमित कदम, कोंडिबा दंडीमे आणि अमर सरवदे यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील करीत आहेत.
डिजिटल अरेस्टच्या धमकीला बळी पडू नका !
पोलीस, एटीएस किंवा ईडी अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी, अटक अथवा डिजिटल अरेस्टची धमकी देणे ही सायबर फसवणुकीची पद्धत आहे. कोणत्याही तपास यंत्रणेकडून डिजिटल अरेस्ट केली जात नाही. त्यामुळे अशा धमक्यांना घाबरून कोणालाही पैसे हस्तांतरित करू नयेत. अनोळखी व्यक्तींना ओटीपी, बँक खात्याची माहिती अथवा वैयक्तिक तपशील देऊ नयेत. सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे.