Coaching classes banned : लातुरातील कोचिंग क्लासेसवर वरवंटा File Photo
लातूर

Coaching classes banned : लातुरातील कोचिंग क्लासेसवर वरवंटा

औद्योगिक क्षेत्रातील व्यवसाय बंद करा; प्रशासनाचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

Coaching classes in Latur banned

लातूर, पुढारी वृत्तसेवा :

लातूर येथील इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमध्ये मूळ करारनाम्यानुसार चालणाऱ्या उत्पादन क्षेत्राव्यतिरिक्त सुरू असलेले ट्यूशन क्लासेससह इतर सर्व व्यवसाय बंद करण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्राने दिले आहेत. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांनी लातूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेच्या अध्यक्षांना या संदर्भातील अधिकृत पत्र जारी केले आहे.

या पत्रानुसार, वसाहतीमध्ये नियमांचे उल्लंघन करून चालवले जाणारे ट्यूशन क्लासेस, कोचिंग क्लासेस, शिकवणी वर्ग, हॉस्टेल, खानावळ, वसतिगृह, अभ्यासिका आणि इतर छोटे-मोठे व्यवसाय तत्काळ बंद करावे लागणार आहेत. या संदर्भात मल्लिकार्जुन शिवलिंग भाईकट्टी आणि अॅड. प्रदीप मोरे यांनी केलेल्या तक्रारींनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती.

या बैठकीतील चर्चेनुसार उद्योग संचालनालय, मुंबई आणि स्थानिक प्रशासनाने ही कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. हे सर्व अनधिकृत व्यवसाय तत्काळ बंद करून त्याचा अनुपालन अहवाल जिल्हा उद्योग केंद्राकडे सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आदेशाचे पालन न झाल्यास संबंधित संस्थेवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा उद्योग केंद्राने दिला आहे. शहरात जवळपास सर्वच ट्यूशन क्लासेस याच परिसरात असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT