Cloudburst Rain : रेणापूर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस File Photo
लातूर

Cloudburst Rain : रेणापूर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस

शेतकरी हतबल; शेती औजारे, साहित्य, चार गुरेही वाहून गेली

पुढारी वृत्तसेवा

Cloudburst rain in Renapur taluka

रेणापुर, पुवारी वृत्तसेवा रेणापूर तालुक्यात मंगळवारी (दि. २९) राात्री झालेल्या इगकु‌टीने शेतकन्यांनी अतोनात नुकसान झाले असून नदी काठच्या शेकडो शेतक-यांच्या शेतातील सोयाबीनच्या गंजी पुरात वाहून गेल्या तर अनेकांच्या गंजी पाण्यात भिजत आहेत. पाच महसुल मंडळात एकाच रात्रीत १५१ मिमी पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्वच लहान - मोठ्या ओद्धघांना पुर येऊन वाहतुक ठप्प झाली होती. तर कांही ठिकाणचे पुल बाहुन गेले. एका शेतक-याची म्हैस पुरात दगावली. अंतात पाणी चुसुन पिकांसोबतच शेतातील इतर साहित्यांचेहि मोठे नुकसान झाल्याने शेतकयांना पुराचा तिसप्यांदा मोठा तडाखा बसला आहे, रेणा मध्यम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने रेणा नदी दुथडी भरून वाहत आहे. लहान मोठ्या ओडयानी उग्र स्वरूप धारण केल्यामुळे येथील नागरीकांच्या सुरक्षेचा प्रयन निर्माण झाला आहे.

मंगळवारी (दि. २९) रात्री धरणाचे सहा दत्वाने २० सें.मी.ने. उघडून रेणा नदी पात्रात ३७५५. २१ अयूमेक्सने (१०६. ३५ क्युसेक्सने) पाण्यागा गिसर्ग केला जात आहे, रेणा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदी काठच्या दोन्ही बाजूच्या शेतकर्याच्या शेतात पाणी घुसल्याने हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली आले आहे. कामखेडा येथील ओडधाला पुर आल्यामुळे यशवंतराव पाटील यांच्या शेतातील गाऊसामध्ये पाणी पुखले असून त्यांचे व ज्ञार शेतकन्यांचे मोटे दु‌सान झाले आहे तसेच रेणापूरचे दिलीप पाटील, संजीवनी पाटील, गोविंद पाटील, रेवती पाटील यांच्या शेतातील ११० पाईप स्प्रिंकलरचे तीन घट, कडब्याच्या दोन व सोयाबीनच्या चार गंजी, २४ पत्रे, ताडपत्री शेती लौजारे आदी साहित्य नदीत बाहुन गेले आहे.

यासोबतच भागवत इस्ताळकर यांच्या दोन तहशी व दोन बैल नदीच्या पुरात वाहून मैले त्यातील एक मौस दगावली असून ती सच्या पाण्यातच आहे. रेणा नदीकाठच्या शेतात मार ते पाच फुट पाणी सापल्याने नितीन गाहे श्रीरंग शिंगडे, मधुराबाई नांदगावकर, सुरेंद्र पाटील, दिगांबर पाटील काशिनाथ पाटील, वैजनाथ हंबीर गांच्यासह अनेकांच्या शेतातील सोयाबीनच्या गंभी, कड़वा शेती औजारे, इलेक्ट्रीक मोटारी, पाईप गुष्ठी, विषक व तुषार संच आदी साहित्य नदीच्या पुरात काहून गेले आहे. अनेकाच्या गंबी रेणा नदीवरील जुन्या पुलाला अडकल्या असून कांडीच्या बाहुन गेल्या आहेत. नारायण को दत्तात्रय ही व सुशिला इगे यांच्या शेतातील सोयाबीनचे पोते पाण्यात भिजत आहेत. अशीच स्थिती मांजरा नदीकावच्या शेकडो शेतकयांची झालेली आहेत. आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्वच पीक पाण्याखाली आली लसुन लहान मोठे ओवे भर भरुन्न बाहत असाल्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांनी रात्र जागून काढली. शेतकयांना शासनाने कतडीने आर्थिक मदत करावी म्हणून रेणापूर तालुक्यातील काँग्रेस शिवसेना ठाकरे गट संभाजी सेन्स, किसान सेनेच्या वतीने रेणापूरच्या तहसीलदारांना निवेदने देण्पात लाली आहेत.

लातूर जिल्ह्यात ३० मंडळांत अतिवृष्टी

लातूर, पूबारी वृत्तसेवा अतिवृष्टी व महापुराचे फटके बसलेले लातूर जिल्हातील शेतकरी कसेबसे सावरत असताना पुन्हा जिल्ह्यात पावसाने तांडव केरले असून मंगळवारी रात्रभर झालेल्या जोराच्या पावसाने नद्यांबा पूर आले व त्यात पुन्हा जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. ६० पैकी तब्बल ३० मंडळांत अतिवृष्टी झाली असून मोठ्या कष्टाने काड़ी काडी जमतून राशी करण्यासाठी स्थलेल्या सोयाबीनच्या गंजी पुरात वाहून नेल्या आहेत.

या आपत्तीने शेतक-यांचे पुरते अवसान गळाले आहे. मंगळवारी रात्री सर्वत्र जोरदार पाऊस झाला. सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी २४.८ मि.मी. पाऊस नौदला गेला असला तरी ३० मंडळांत अतिवृष्टी झाली बन्याच मंडळात हा पाऊस शतकापार गेला, रेणापूर वालुक्यात १०७ मि.मी. पाऊस नोंदला गेला, या तालुक्यात सर्वच मंडळांत अतिवृष्टी झाली, धरणाच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरण पाणी पातळी नियंत्रीत करण्यासाठी बदौत पाणी सोडण्यात आल्याने रेणा नदीला पूर आला व पुराचे पाणी शेतात शिरले अनेकांच्या सोयाबीनच्या गंजी या पुरात बाहुन गेल्या तर बन्याच गंर्जीत पाणी शिरले. शेती औजारे वाहून गेली. वाहत जाणान्या गंजी पाहताना शेतकयांना अतिव दुःख झाले.

अहमदपूर तालुक्यातही सर्वच मंडळांत अतिवृष्टी झाली. दरम्यान बऱ्याच शेतकन्यांबी रथ्वीचा पेरा केला होता या पावसामुळे पेरलेले ते वाहून गेल्याने दुबार पेरणी करावी लागणार आहे. दरम्यान शिरूर अनंतपाळ, देवणी, तालुक्यालाही पावसाने झोडपले आहे. शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

नेकनूरसह परिसरात पेरण्या खोळंबल्या

नेकजूर पुढारी वृत्त-सेवा मे महिन्यात सुरू झालेला पाऊस नोव्हेंबर उजाडत असताना अजून सुरूच आहे. यावर्षी दिवाळीत थंडी ऐवजी लोकांना पाऊस डझेलावा लागला. शेतीचे गणित तर पुरते बिघडले असूज पेरणीला अगोदरच मोठा उशीर झाला असताना सुरू झालेल्या पेरण्या खोळंबल्या आहेत तर काही ठिकाणी गडबड करीत केलेल्या पेरणीवर पाणी पडल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. बेकनुर परिसरात कांद्याची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना सततच्या पावसाने नासाडीची भीती निर्माण झाली आहे.

नवरात्रातच थंडीची चाहूल लागत असताना यावर्षी मात्र दिवाळीतही पावसाने सुट्टी दिली नाही. दोन दिवसात तर पावसाळ्यासारखे वातावरण बनले असून मंगळवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस बुधवारी ही आभाळ घेऊन बरसतच राहिल्याने यावर्षी उन्हाळ्यापाठोपाठ हिवाळ्यात पावसाळा कायम राहतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. रथ्वीच्या पेरणीला दिवाळीपूर्वी शेती बघून सुरवात करण्यात आली, राजमा, ज्वारी, हरभरा आणि कांदा या पिकांना रब्बीला प्राधान्य असते मात्र या पावसामुळे लागवड केलेला कांदा कुन्जूतो की काय अशी परिस्थिती या पावसामुळे निर्माण झाली आहे. दोन दिवसांतील सतत धारेने पेरलेले वाया तर जाणार जाही जा अशी भीती असून पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांना अजून असाच उशिर होत राहिला तर काय पैराठे या प्रश्नाने घेरले आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात पिकांचे नुकसान

शिरूर अनंतपाळ, पुढारी वृत्तसेवा ।

मंगळवारी दुपारी शिरूर अनंतपाळ तालुक्यात वादळासह जोरदार पावसाने पुन्हा हजेरी लावली. सोमवारी झालेल्या पावसानंतर सलग दुसन्या दिवशी झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्यानंतर आता पुन्हा रब्बी पेरणीवर पावसाचे सावट आले आहे.

मंगळवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामु‌ळे मांजरा आणि धरणी नद्यांना पुन्हा पूर आला. सततच्या पावसामुळे शेतातील ओल अजूनही कायम असून, नव्या पावसामुळे जमिनी तयार करण्याचे काम रखडले आहे. त्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी उशिरात होण्याची शक्यता आहे. अचानक झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नेतात ठेवलेले सोयाबीनचे द्विगारे निजले आहेत, त्यांबा झाकण्यासाठी शेतकन्यांना धावपळ करावी लागली.

सततच्या पावसामुळे मशागतीचे काम ठप्प झाले असून काही ठिकाणी अजूनही सोयाबीन काढणी बाकी आहे. वा पावसामुळे उभे आणि काढणीसाठी तवार पिंक खराब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही शेतांमध्ये go अजूनही पाणी साचलेले आहे. त्यामुळे सोयाबीन काढणी आणि रब्बी पेरणीची तयारी यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी मशागत सुरू केली असली, तरी मंगळवारी झालेल्या বা पावसामुळे पुन्हा एकदा नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गात यामुळे निराशा पसरली असून, हवामान स्थिर होईपर्यंत पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT