Chakur Nagar Panchayat Kapil Makne Resignation
चाकूर : येथील नगरपंचायतचे नगराध्यक्ष कपिल गोविंदराव माकणे यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी दिला. दरम्यान, विशेष सभेपूर्वी त्यांनी राजीनामा दिल्याने विशेष सभा तूर्तास स्थगित करण्यात आली.
नगर पंचायतीचे नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्यावर १४ नगरसेवकांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.
त्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्यावर अविश्वास निर्माण झाल्याने त्यांना पदावरून काढून टाकण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये विशेष सभा सोमवारी नगर पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आली होती. परंतु विशेष सभेपूर्वी नगराध्यक्ष माकणे यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केल्याची माहिती पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे यांनी दिली. नगरपंचायतच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबतची पुढील प्रक्रिया कळविण्यात येईल, असे सांगितले.