Latur News : सीबीआयकडून लातुरात सेवानिवृत्त प्राध्यापकाची चौकशी file photo
लातूर

Latur News : सीबीआयकडून लातुरात सेवानिवृत्त प्राध्यापकाची चौकशी

नीट यूजी पेपर फुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचले असून बुधवारी रात्री उशिरा सीबीआयची दोन पथके लातूरमध्ये दाखल झाली.

पुढारी वृत्तसेवा

CBI interrogates retired professor in Latur.

लातूर, पुढारी वृतसेवा नीट यूजी पेपर फुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचले असून बुधवारी रात्री उशिरा सीबीआयची दोन पथके लातूरमध्ये दाखल झाली. गुरुवारी एका खासगी माहाविद्यालयातील क्लासेसच्या सेवानिवृत्त प्रमुखाच्या ताब्यात घेऊन चौकशीचीही त्याची चौकशी चर्चा प्राध्यापकाला केल्याची माहिती आहे.

नीट पेपर - सेट करण्याचे काम या प्राध्यापकाने केले असून पेपर फुटीचा संशय त्यांच्यावर असल्याने त्यांची चौकशी झाली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान एका खासगी क्लासेसच्या प्रमुखाचीही पथकाने कसून चौकशी केल्याचे बोलले जात आहे.

लातूर शहरात काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर एक वित्रफीत वायरल झाली होती. या व्हिडीओत दोन मुली त्यांच्या क्लासेसने नीट २०२६ परीक्षेपूर्वी घेतलेल्या सराव परीक्षेतील ४२ प्रश्न जसेच्या तसे नीट २०२६ च्या मुख्य परीक्षेत आले होते असे सांगत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर एका पालकाने या संदर्भात लातूरचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात तक्रार दिली होती.

बुधवारी रात्री उशिरा सीबीआयचे एक पथक लातूर शहरात दाखल झाल्याची तसेच त्यांनी लातूरमधील रसायनशास्त्राच्या एका सेवानिवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्याची शहरभर चर्चा आहे. मोबाईलवरून पाठण्यात आलेल्या पेपरवरील लातूर येथे दाखल तक्रारीवरून सहा जणांची चौकशी या प्रकरणाचे तपास अधिकारी डीवायएसपी समीरसिंह साळवे यांनी केली आहे. तथापि गुन्हा दाखल करावा असे पुरावे अद्याप त्यांच्या हाती लागले नाहीत. या प्रकरणाची तपासणी सुरूच असल्याचे साळवे यांनी सांगितले.

हस्तलिखीत प्रत्रांचे हस्ताक्षर नेमके कोणाचे आहे? त्याचा या प्राध्यापकाशी व लातूरच्या क्लासेसशी काही संबंध आहे का ? याचाही तपास घेण्यात येत असल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT