Theft News
उदगीर : उदगीर तालुक्यातील लोणी येथे रात्रीच्या सुमारास घरफोडी करून रोख रक्कम ३ लाख ५० हजार व १५ हजार रुपयांचा मोबाईल अशी ३ लाख ६५ हजार रुपयांची चोरी केली आहे. याप्रकरणी बुधवारी (२३ एप्रिल) उशिरा रात्री उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २२ एप्रिल रोजी मध्यरात्री फिर्यादी यांच्या घरातील कपाटात ठेवलेली ३ लाख ५० हजार रुपये व त्यांच्या मित्राचा १५ हजार रुपयांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी विजय विलास डांगूर (रा. लोणी ता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत.