घटनास्थळी दाखल झालेली पोलिसांची टीम. Pudhari Photo
लातूर

लातूर : घरात घुसून जिवे मारण्याचा प्रयत्न; ३९ जणांवर गुन्हा दाखल

किनगावला छावणीचे स्वरूप

Suraj Kamble

किनगाव : अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील एका मौलानासोबत एका तरुणाची मोटारसायकलच्या लागलेल्या धक्यावरुन वादावादी झाली होती. मौलानाला मारहाण झाली या चुकीच्या समजूतीने एका आक्रमक टोळक्याने शनिवारी (दि१९ ) रोजी रात्री घरात घुसून, जोर जोरात आरडाओरडा करून, मौलानाला मारहाण करणाऱ्यास जिवंत सोडणार नाही असे म्हणत दशहत निर्माण करून फिर्यादी गणेश गोविंद दहिफळे (वय ३० ) या तरूणाला व त्याच्या आईस मारहाण करून गंभीर जखमी केले.

जखमी गणेश दहिफळे यांच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात ३९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आले असून इतर ३७ जणांना पकडण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनचे एक पथक व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे एक पथक रवाना झाले आहे. पुढील तपास अप्पर पोलीस अधिकारी डॉ. अजय देवरे उपविभागीय अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT