वाहतूक कोंडी, अतिक्रमण, चोरीच्या घटना, महिला सुरक्षा ! file photo
लातूर

वाहतूक कोंडी, अतिक्रमण, चोरीच्या घटना, महिला सुरक्षा !

लातुरात कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापाऱ्यांची पोलिस अधीक्षकांसमवेत बैठक

पुढारी वृत्तसेवा

Agricultural Produce Market Committee and Traders Hold Meeting with Superintendent of Police in Latur

लातूर, पुढारी वृत्तसेवा: लातूर मार्केट यार्ड परिसरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमण, चोरीच्या घटना, महिला सुरक्षा आदी प्रश्नांवर कृषी उतपन्न बाजार समिती व परिसरातील व्यापारी शिष्ठमंडळाने पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांची घेतली व या समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. पोलिस अधीक्षक तांबे यांनी शिष्टमंडळासमवेत विशेष बैठकीत सविस्तर चर्चा करून याकामी उपाययोजना करण्याची हमी दिली.

पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या बैठकीस बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, सचिव चंद्रकांत पाटील, सर्व सभासद, विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक व्यापारी तसेच संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. लातूरची बाजारपेठ ही सर्वात जुनी बाज ारपेठ असून येथे दररोज पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर व्यवहार सुरू होतात.

कालावधीत हजारो शेतकरी, व्यापारी व ग्राहक एकाच वेळी बाजारात दाखल होत असल्याने परिसरात प्रचंड गर्दी निर्माण होते. परिणामी वाहतूक कोंडी, गोंधळ, पार्किंगची समस्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीने विविध अडचणी निर्माण होत असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले.

या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये यसाठी गूळ मार्केट ते शिवाजी मार्केट गेट या मार्गावरील रहदारीचे नियोजन करण्यावर विशेष भर देण्यात येईल. वाहनांच्या प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करणे, ठराविक वेळेनुसार वाहनांची आवक-जावक नियंत्रित करणे, गर्दीच्या वेळेत वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात करणे तसेच आवश्यक तेथे तात्पुरते निर्बंध लागू करणे याबाबत संबंधित अधिकारी यांना निर्देश देण्यात आले. बाजार परिसरात व्यापाऱ्यांकडून रस्त्यावर होणारे अतिक्रमणाबाबत महानगरपालिकेच्या समन्वयाने विशेष मोहीम राबवून रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे.

बाजार परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री, मटका तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देण्यात आले. याशिवाय बाजार परिसरात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

महिलां सुरक्षेच्या दृष्टीनेही विशेष चर्चा करण्यात आली असून बाजार परिसरात महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी अतिरिक्त पोलिस गस्त, संवेदनशील ठिकाणी विशेष देखरेख, आवश्यकतेनुसार महिला पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच छेडछाड व इतर गुन्ह्यांवर संवेद नशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवून नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी मार्केट परिसरातील सर्व समस्या अत्यंत गांभीर्याने घेतल्या जात असून त्यावर तातडीने व परिणामकारक उपाययोजना करण्यात येतील. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापारी, शेतकरी व नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे मार्फतीने बाजार समिती तसेच मार्केट परिसरात जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व समितीमार्फत खासगी सुरक्षा रक्षक यांची नियुक्ती करावी जेणेकरून बाजार परिसरातील सर्व अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी मदत होईल असे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर यांना आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT