Action taken by the State Excise Department; 9 people arrested
लातूर, पुढारी वृत्तसेवा जिल्हयात अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक विरोधात उदगीर विभाग यांनी दि. २७डिसेंबर २०२५ ते दि. २ जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये कारवाई करून १० गुन्हे नोंद केले व ९ जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उप-आयुक्त बी. एच. तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्हयाचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २७डिसेंबर २०२५ ते दि. २ जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये जिल्हयात अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक विरोधात उदगीर विभाग यांनी एकूण १० गुन्हे नोंद करण्यात आले. यात ९ आरोपींना अटक करण्यात आली.
सदर गुन्हयामध्ये एक अटो, चार दुचाकी अशा ५ वाहनांवर कारवाई करण्यात आली तसेच रसायन १२०० लि. देशी ६८ लि., विदेशी ५३ लि., असा एकूण ६,८८,६२० रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
अवैध धाब्यांवर दारु पिण्यास मनाई असतांना धाबा मालक यांनी दारु पिण्यास जागा दिल्याबाबत तसेच मद्यपीविरुध्द कलम ६८/८४ नुसार सक्त कारवाई करण्यात येणार आहे.
सदरच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, केशव राऊत, उप अधीक्षक एम. जी. मुपडे, निरीक्षक वि. ओ. मनाळे, रघुनाथ कडवे, दुय्यम निरीक्षक आर. डी. भोसले, एन. टी. रोटे, एस. पी. काळे सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, जवान ज्योतीराम पवार, संतोष केंद्रे, विशाल गायकवाड यांनी सहभाग नोंदविला.