Action Taken Against Illegal Gutkha; Contraband Worth ₹8 Lakhs Seized
उदगीर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने एका वाहनावर छापा टाकून ते वाहन, सुगंधित तंबाखू, गुटखा असा ७ लाख ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एकावर उदगीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ओमकार नरसन नरहारे (वय २१, रा. हैबतपूर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलिस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पथकास आरोपी ओमकार नरसन नरहारे (वय २१, रा. हैबतपूर) हा कारमध्ये प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती.
त्यावरून पथकाने डिग्रस गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सापळा लावला. कार थांबवून चौकशी व कारची तपासणी केली असता, मोठ्या प्रमाणात पान मसाला गुटखा, सुगंधित तंबाखू मिळाली. एकूण मुद्देमालाची किंमत ७लाख ९३ हजार २०० रुपये असून आहे, ज्यात कारची किंमत साडे चारलाख आहे.