Latur News : आचारसंहितेत नववर्षाचे स्वागत ढाब्यावर कराल तर जेलमध्ये जाल ! File Photo
लातूर

Latur News : आचारसंहितेत नववर्षाचे स्वागत ढाब्यावर कराल तर जेलमध्ये जाल !

तळीराम रडारवर : ढाब्यावर मद्यप्राशन करणारे ६ जण गजाआड

पुढारी वृत्तसेवा

According to the code of conduct, if you celebrate the New Year at a roadside restaurant (dhaba), you will end up in jail

लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली असून या कालावधीत ढाब्यावर बसून मद्यप्राशन करणाऱ्यांवर लातूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने वॉच ठेवला आहे. २८ डिसेंबर रोजी दोन ढाब्यावर बसून दारू पिणाऱ्याविरोधात दोन गुन्हे दाखल करून सहा तळीरामांना अटक केली आहे.

लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष गुन्हा अन्वेषणाच्या मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क मुंबई विभागाचे आयुक्त राजेश देशमुख व राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे उपायुक्त बी. एच. तडवी कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क लातूर विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त एम. जी. मुपडे यांच्या नेतृत्वाखाली लातूर महापालिकेच्या हद्दीत २८ डिसेंबर रोजी औसा रोड येथील हॉटेल राजवीर ढाबा व हॉटेल रायगड ढाबा या दोन ढाब्यावर बसून दारू पीत असताना दोन गुन्हे नोंद केले त्यामध्ये मद्यपी व ढाबाचालाकासह एकूण ६ आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ व ८४ अन्वये कारवाई करण्यात आली.

दरम्यान, ढाब्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांना तसेच ढावा मालक यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. नविन वर्षाच्या स्वागताला ढाब्यावर मद्यप्राशन केले तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर सदर ढाब्यांवर असणार आहे.

सदर कारवाईमध्ये लातूर विभागाचे निरीक्षक आर. एस. कोतवाल, दुय्यम निरीक्षक बी. आर. वाघमोडे, जी. व्ही. साळवे, बी. एल. येळे, सहायक दुय्यम निरीक्षक मंगेश खारकर तसेच जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, सौरभपाटवदकर व जवान वाहनचालक व्ही. व्ही. परळीकर यांनी सहभाग नोंदविला.

आचारसंहिता काळात २३ तळीरामांना अटक

महापालिकेच्या आचारसंहिता कालावधीत १६ ते २८ डिसेंबरदरम्यान लातूर महानगरपालिका हद्दीत ढाब्यावरील गुन्हे व अवैध मद्य विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क लातूर विभागाने १९ गुन्हे नोंद केलेले असून त्यामध्ये २३ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यांमध्ये एकूण ६ ढाब्यांवर कारवाई करण्यात आली असून, सदर कालावधीतील गुन्ह्यात हातभट्टी दारू २६३ लिटर, देशी दारू १६.८३ लिटर, विदेशी दारू ११.४५ लिटर, ताडी २० लिटर असा एकूण ५०,१२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT