लातुरात कोयत्याने केलेल्या हल्ल्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू Pudhari File Photo
लातूर

Latur Crime News : लातुरात कोयत्याने केलेल्या हल्ल्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू

औसा रोडवरील पुरणमल शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

A student died in a coyota attack in Latur

लातूर, पुढारी वृतसेवा : लातूर शहरात रविवारी रात्री वैभवनगर येथे कोयता गँगने पसरवलेल्यादहशतीच्या बातमीची शाई वाळते न वाळते तोच सोमवारी (दि. १६) सायंकाळी येथील औसा रोडवर असलेल्या पुरणमल शासकीय तंत्रनिकेत कॉलेजजवळ झालेल्या कोयता हल्ल्यात एक विद्यार्थी मरण पावला. विक्रम नारायण पांचाळ (२१) असे त्याचे नाव असून, आदित्य भारत साडे (२०), सुजल बलभीम रेड्डी (२०) व शंतनू माणिक परांदे (२७) अशी जखमींची नावे आहेत.

रविवारी रात्री लातूर शहरातील वैभवनगर परिसरात काही तरुणांनी कोयते घेऊन रस्त्यावर फिरत दहशत पसरवली होती. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. काही मिनिटांतच या गँगच्या व्हिडिओ क्लिप्स समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या. अशातच गजबजलेल्या औसारोडवर सोमवारी सायंकाळी पुरणमल लाहोटी तंज्ञनिकेतन वसतिगृहातीलकही विद्यार्थ्यांत वाद झाला.

यावेळी कोयत्याने झालेल्या हाणामारीत विक्रम नारायण पांचाळ हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. शासकीय रुग्णालयात त्यालादाखल केले असता डॉक्टरांनी तपासाअंती मृत घोषीत केले. या हाणामारीत अन्य तिघे जखमी झाले आहेत. मात्र त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एन. सोनवणे यांनी सांगितले. मृत विक्रम याच्या छातीच्या डाव्या बाजूवर खोलवर वार करण्यात आले होते.

तो गंभीर जखमी झाला होता व रक्तस्रावही अधिक झाल्याने तो मरण पावला. प्राथमिक माहितीनुसार एका विद्यार्थ्यान दुसऱ्याच्यादुचाकीचे रीडिंग मीटर फोडल्यामुळे वाद सुरू झाला. त्यानंतर त्याविद्यार्थ्याने मीटर बदलून दिले, परंतु नंतर बोलताना वाद झाला त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी विक्रम पांचाळ याच्यावर व त्याच्या अन्य तीन मित्रांवर कोयत्याने वार करण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी भेट

कोयत्याने झालेल्या हल्ल्यात विद्यार्थी मृत्यू झाल्याची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी समरसिंह साळवे, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे व त्यांच्या टीमने घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थी तसेच काही नागरिकांशी चर्चा करुन घटनेची माहिती घेतली. व स्थानिक पोलिसांना योग्य तो तपास करून आरोपीवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT