हातचलाखीने सोन्याचे नेकलेस चोरले; महिलेविरोधात लातुरात गुन्हा  file photo
लातूर

हातचलाखीने सोन्याचे नेकलेस चोरले; महिलेविरोधात लातुरात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

लातूर, पुढारी वृत्तसेवा : हातचलाखी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला १ लाख ३३ हजार रुपयांच्या मुद्देमालासह अवघ्या १० दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. नाझिया मुकद्दर काजी ऊर्फ नाझिया आसिफ शेख, (वय ३७), असे तिचे नाव असून ती शांतीनगर, सोलापूर येथील रहिवासी आहे.

लातूर शहरातील पोलिस ठाणे शिवाजीनगर हद्दीमध्ये एका सोन्या-चांदीचे दुकानातून दोन बुरखा परिधान केलेल्या महिलांनी हातचालाखी करून १८ ग्रॅम वजनाचे एक लाख ३३ हजार रुपयांचे सोन्याचे नेकलेस चोरल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलिस ठाणे शिवाजीनगर येथे अज्ञात महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अमलदारांचे पथक तपास करीत होते. दरम्यान पथकांना गुप्त बातमीदाराकडून हातचालाखी करून सोन्या-चांदीच्या दुकानातून दागिने चोरणाऱ्या महिला सोन्याचा मुद्देमाल विकण्यासाठी एक बुरखा परिधान केलेली महिला बसस्थानक ते गांधी चौक जाणाऱ्या रोडवर थांबलेली आहे. पथकाने त्या परिसरात सापळा लावून संशयित महिलेला ताब्यात घेतले.

व विचारपूस केली व तिच्याजवळील प्लास्टिक पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये सोन्याचे एक नेकलेस मिळून आले. त्याबाबत त्याच्याकडे विचारले तेव्हा तीने तिची आई मुमताज नजीर शेख, (वय ६०) यांनी मिळून १० ते १२ दिवसांपूर्वी लातूर शहरातील एका सराफा दुकानातून नेकलेस चोरल्याचे सांगितले.

तसेच त्याची विक्री करणार होते असे सांगितले. त्यावरून नमूद महिलेला त्याने चोरलेला ०१ लाख ३३ हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेससह ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता पोलिस ठाणे शिवाजीनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकातील पोलिस अमलदार संजय कांबळे, युवराज गिरी, जमीर शेख, सचिन धारेकर, महिला पोलिस अंमलदार घनघावे, भुसे यांनी ही कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT