Latur Crime News : दुधात भेसळ करण्यासाठी साठवलेले १ हजार ४२५ किलो घातक पावडर जप्त Pudhari
लातूर

Milk Adulteration : दुधात भेसळ करण्यासाठी साठवलेले १ हजार ४२५ किलो घातक पावडर जप्त

दुधात भेसळ करण्यासाठी साठवून ठेवलेल्या तब्बल १४२५ किलो घातक पावडरचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने औसा तालुक्यातील किल्लारी येथे उघडकीस आणला.

पुढारी वृत्तसेवा

1,425 kg of hazardous powder stored for milk adulteration seized

औसा, पुढारी वृत्तसेवा : दुधात भेसळ करण्यासाठी साठवून ठेवलेल्या तब्बल १४२५ किलो घातक पावडरचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने औसा तालुक्यातील किल्लारी येथे उघडकीस आणला. या कारवाईत सुमारे ७५०० लिटर संशयित भेसळयुक्त दुधाचे नमुने घेऊन उर्वरित दूध नष्ट करण्यात आले. या प्रकरणी चौघांविरुद्ध किल्लारी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाने किल्लारीवाडी रोडवरील निळकंठेश्वर दूध संकलन व शीतकरण केंद्रावर छापा टाकला. तपासणीदरम्यान दुधात भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या पावडरच्या बॅगा आढळून आल्या. या बॅगांचे एकूण वजन १४२५ किलो झाले. कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी सुमारे ७५०० लिटर संशयित भेसळयुक्त दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले, तर उर्वरित दूध नष्ट करण्यात आले.

तसेच घातक पावडर, दूध साठविण्याचे साहित्य आदींसह एकूण ५ लाख ३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी व्यंकट शिवाजी माने (रा. निलंगा), विजय माणिक रूबदे (रा. किल्लारी), भाऊराव सुग्रीव भोसले (रा. किल्लारी) तसेच राकेश रतनलाल पारीक, श्री बालाजी ट्रेडर्स, पद्मावती कॉम्प्लेक्स, जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी पूजा शिवाजीराव शिंदे (अन्न व औषध प्रशासन, लातूर) यांच्या फिर्यादीवरून किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT