मराठवाडा

लातूर : वैद्यकीय बिलासाठी लाच मागणाऱ्या महिला पोलीस लिपिकास अटक

backup backup

लातूर; पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय बिलाच्या फाईल मंजूरीसाठी २४ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका महिला लिपिकास अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कल्याणी जितेंद्र सोनवणे (वय ४१) असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे.

कल्याणी सोनवणे यांनी तक्रारदाराच्या पत्नीच्या वैद्यकीय बिलाची फाईल मंजुरी करता पाठवण्यासाठी व जानेवारी महिन्यात दाखल केल्यास तीन बिलांच्या फाईल विना त्रुटी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयास पाठवण्यासाठी २४ हजार रुपयांची लाच तक्रारदारास मागितली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबीला कळवले होते. त्यानुसार सापळा लावण्यात आला होता. तक्रारदार लाच देण्यासाठी गेला असता सोनवणे यांना संशय आल्याने त्यानी लाच घेण्यास टाळाटाळ केली. परंतु पुन्हा तिची मागणी केली. तक्रारदार पुन्हा पैसे देण्यासाठी गेला असता संशय आल्याने सोनवणे यांनी ती स्वीकारली नाही. तथापि पंचा समक्ष लाच मागितल्याचे उघड झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी सोनवणे या नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक असून त्या प्रतिनियुक्तीवर लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहेत.

SCROLL FOR NEXT