मराठवाडा

लातूर : लॉजच्या खिडकीतून पडून मुलीचा मृत्यू

backup backup

लातूर; पुढारी वृत्तसेवा : लॉजच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून कोसळल्याने एका अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. आद्या देशपांडे असे तिचे नाव असून अंबाजोगाई रोड परिसरात असलेल्या एका लॉजवर सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.

आद्या ही तिच्या मावशी समवेत हैदराबादहून लातूर येथे त्यांच्या नातेवाईकाकडे मुंजीच्या कार्यक्रमासाठी आली होती. ते एका लॉजवर मुक्कामी होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर आद्या व तिची मावशी लॉज मध्ये आले व रूम मध्ये विश्रांतीसाठी गेले. आद्या ही दुसऱ्या मजल्यावर असलेल्या रूम मधील खिडकीला टेकून बसली तथापि अचानक खिडकी उघडली गेली व तोल जाऊन ती खाली पडली. दरम्यान ती गंभीर जखमी झाली. यावेळी ती विजेच्या तारावर कोसळली अशीही चर्चा शहरात होती. त्यानंतर तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनास्थळाला शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी भेट दिली. या घटनेची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT