डोणगाव : गाडेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेवरील टिनपत्रे उडाली आहे. 
जालना

ZP school classroom shortage | जिल्हा परिषद शाळांबाबत प्रशासन उदासीन

गाडेगव्हाण : पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना बसावे लागते एकाच वर्गखोलीत

पुढारी वृत्तसेवा

शेख फेरोज

डोणगाव : गरीब गरजू मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी जिल्हा परिषद मराठी शाळा ही एकमेव आशेचा किरण आहे. मात्र असं असताना या शाळांच्या बाबतीत प्रशासन उदासीन असल्याचं दिसून येत आहे. कारण गाडेव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत वर्गखोल्यांअभावी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसावं लागत आहे. दुसऱ्या वर्गखोलीवर टिनपत्रे उडाली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

गाडेगव्हाण येथील जिल्हा परिषद एकूण तीन वर्गखोल्या आहे. त्यातील एका वर्गखोलीवरून अनेक महिन्यापासून टिनपत्रे उडून गेलेली आहे. तर दुसरी वर्गखोलीची दुरवस्था झालेली आहे. उर्वरित एकाच वर्गखोलीत पहिल्या ते पाचवीचे वर्ग भरत आहे. या शाळेत ६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शाळेसाठी दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर शिक्षकांच्या जागा रिक्त आहे. वर्गखोल्या नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

जाफराबाद येथील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना वारंवार लेखी व तोंडी तक्रार करूनसुद्धा याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था पाहिल्यास शिक्षण व्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. शाळेची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली असून छताचे पत्रे गायब झाले आहेत.

सर्वात भयंकर बाब म्हणजे, इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र शिक्षण मिळते. वरिष्ठांनी लक्ष घालून वर्गखोल्या बांधून देण्याची मागणी होत आहे. मागील दहा महिने अगोदर ग्रामपंचायतने जालना जिल्हा परिषद विभागाकडे ग्रामपंचायतचा ग्रामसभेचा ठराव देण्यात आला आहे.

शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शाळेसाठी तीन वर्गखोल्या आहेत. दोन वर्गखोल्यांची दुरवस्था झाल्याने एकाच वर्गखोलीत वर्ग भरत आहे. या संबंधी गटशिक्षणाधिकारी यांना भेटून निवेदन दिले. तसेच नवीन इमारत देण्याची मागणी केलेली आहे. शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.

- संतोष बनकर, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT