१ ते ५ यलो अन् ऑरेंज अलर्ट जारी (file photo)
जालना

१ ते ५ यलो अन् ऑरेंज अलर्ट जारी

काळजी घ्यावी; सतर्क राहण्याचा जिल्हा प्रशासनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Yellow and Orange Alerts Issued for Days 1 to 5

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात हवामान विभागाच्यावतीने १ ते ५ एप्रिल दरम्यान यलो व ऑरेंज अलर्टचा इशारा जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.

जिल्ह्यात हवामान विभागाने १ एप्रिल रोजी यलो अलर्ट जारी केला असून, पुढील काही दिवसांमध्ये पावसासह वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. १ एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

२ व ३ एप्रिल रोजी परिस्थिती अधिक तीव्र

राहण्याची शक्यता असून, या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ४ एप्रिल रोजी पुन्हा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, काही भागात मध्यम पावसासह वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे. ५ एप्रिल रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्याच्या वेळी अनावश्यकपणे घराबाहेर पडणे टाळावे. तसेच झाडे, वीज खांब व उंच बांधकामांपासून दूर राहावे. गरज भासल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

काळजी घ्या

यलो व ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घ्यावी, तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT