आ. खोतकरांच्या प्रयत्नातून ३२ कोटींच्या कामांना मंजुरी File photo
जालना

आ. खोतकरांच्या प्रयत्नातून ३२ कोटींच्या कामांना मंजुरी

या निधीमुळे मतदारसंघातील अनेक गावांना जोडणारे महत्त्वाचे रस्ते दुरुस्त होणार असून ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Works worth 32 crores approved through MLA Khotkar's efforts

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते मजबूत व दर्जेदार करण्यासाठी आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्प व नाबार्ड मधुन ३२ कोटी रुपयांच्या विविध रस्ते सुधारणा कामांना निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीमुळे मतदारसंघातील अनेक गावांना जोडणारे महत्त्वाचे रस्ते दुरुस्त होणार असून ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे.

मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये भोकरदन - जालना रामनगर सावरगाव हाडप रस्ता सुध ारणा करण्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पोखरी सि. ते नाव्हा बाजीउम्रद सेवली या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी ६ कोटी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

गोलापांगरी - दुधना काळे गाव -हिस्वन कारला हिवरा रोशनगाव ते या रस्त्याच्या सुधारणेसाठी ७ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जालना दरेगाव ढोकसाळ या रस्त्याच्या दुरुस्ती व सुधारणा कामासाठी ८ कोटी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले.

विकासासाठी सातत्याने पाठपुरावा

जालना विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील रस्ते सुस्थितीत असणे हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणा कामांना प्राधान्य देण्यात येत आहे, असेही आमदार खोतकर यांनी स्पष्ट केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT