Voter awareness signature campaign receives a good response in Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी व आयुक्त जालना शहर महानगरपालिका आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या मतदार जनजागृती स्वाक्षरी मोहिमेला महिलांचा मोठ्या प्रमाणावर उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील विविध भागांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवत मतदानाचा हक्क बजावण्याचा संकल्प केला.
या स्वाक्षरी मोहिमेदरम्यान महिलांनी "माझे मत माझा अधिकार", "लोकशाही सशक्त करण्यासाठी मतदान आवश्यक" अशा संदेशांना पाठिंबा देत स्वाक्षऱ्या केल्या. मतदानाबाबत जनजागृती वाढविणे, महिलांचा राजकीय सहभाग अधिक मजबूत करणे तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. मोहिमेत सहभागी महिलांनी इतर नागरिकांनाही मतदानासाठी प्रेरित करण्याचा निर्धार व्यक्त केला. निवडणूक प्रशासन, स्वीप पथक तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. महिला मतदाराच्या सक्रिय सहभाग सहभागामुळे लोकशाही अधिक बळकट निश्चितच मदत होईल.
जालना शहर महानगरपालिका निवडणुकीत महिलांचा वाढता सहभाग आणि जागरूकता ही सकारात्मक बाब असून, येत्या मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर महिला मतदार मतदान करतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
कार्यक मासाठी उपजिल्हाधिकारी श्रीमती नम्रता चाटे, अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपायुक्त श्रीमती नंदा गायकवाड, राजेश कानपुडे स्वीप समिती नोडल अधिकारी प्रमिला मोरे, विजय सांगळे, पांडुरंग डाके तसेच सहाय्यक कर्मचारी श्रीमती अनिता चंद्रहास, आशा गाढे, विलास खरात आदी समिती सदस्य मेहनत घेत आहेत.
स्वाक्षरी मोहीम
मोहिमेत सहभागी महिलांनी इतर नागरिकांनाही मतदानासाठी प्रेरित करण्याचा निर्धार व्यक्त केला. निवडणूक प्रशासन, स्वीप पथक तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. महिला मतदाराच्या सक्रिय सहभाग सहभागामुळे लोकशाही अधिक बळकट निश्चितच मदत होईल.