शहागड : अंबड तालुक्यातील शहागडला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले. मंगळवारी संध्याकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह एक तास पाऊस झाला. आज (दि. ७) दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा जोरदार पाऊस झाला.
यावेळी वादळी वारा, विजेचा कडकडाटात पाऊस झाला. यावेळी झाडाच्या फांद्या तुडल्या. तारावर झाडांच्या फांद्या पडल्याने विद्युत पुरवठा एक तास खंडित झाला होता. राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील वाहनधारकांना वाहने चालविताना गाड्यांचे लाईट लावावे लागले. जोरदार वाऱ्यामुळे गावराण आंब्याचे नुकसान झाले. घरावरील पत्रे उडून गेले. दरम्यान, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्य़ामुळे वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.