Jalna Pimpalgaon Renukai Lightning Deaths Two Youth
पिंपळगाव रेणुकाई: भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात शेतात काम करीत असताना वीज कोसळून दोघे जण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला. मृत झालेल्या तरुणाचे नाव गणेश प्रकाश जाधव (वय ३५), असे आहे. सचिन विलास बावस्कर (वय २८) असे आहे. तर प्रशांत रमेश सोनवणे हा जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
कोठाकोळी येथील हे तिघेही तरुण सकाळी कामानिमित्त पिंपळगाव रेणुकाई येथे आले होते. दुपारी विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसाला सुरूवात झाली. मात्र, यावेळी अचानक वीज कोसळून गणेश जाधव व सचिन बावस्कर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी प्रंशात सोनवणे हा गंभीर जखमी झाला. मृतदेह पिंपळगाव रेणुकाई येथील सरकारी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत. घटनेतील मृत हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तर सचिन बावस्कर हा तरुण अविवाहित आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.