Jalna News : एलपीजीवर जुगाड केलेली दुचाकी जप्त File Photo
जालना

Jalna News : एलपीजीवर जुगाड केलेली दुचाकी जप्त

नाकाबंदी दरम्यान एलपीजीवर चालणारी जुगाड केलेली दुचाकी भोकरदन पोलिसांनी जप्त केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Two-wheeler rigged to run on LPG seized

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा नाकाबंदी दरम्यान एलपीजीवर चालणारी जुगाड केलेली दुचाकी भोकरदन पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई १६ मे रोजी रात्री केली. त्या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रात्री दहा वाजे दरम्यान नाकाबंदी लावण्यात आली होती. पोलीस निरीक्षक किरण बिडवे सह अधिकारी व अंमलदार यांनी एक संशयास्पद मोटारसायकलची पाहणी केली असता मोटारसायकल क्रमांक एमएच२२, सी ९५०७ हिरोहोंडा १०० मोटारसायकलचे डिक्कीमध्ये एक नवीन वेल्डींग करून डीक्कीचे आकाराची गॅसची टाकी बनवलेली आढळून आली.

मोटारसायकल चालकास विचारपूस केली असता त्याने त्याचे नांव मोहमंद अदिल शेख रफिक २० वर्षे, रा. नवे भोकरदन असे सांगीतले व गॅसचे टाकीमध्ये एल.पी.जी. सिलेंडर गॅस भरून सदर मोटासायकल मध्ये बदल करून एल.पी.जी. गॅसवर सदर मोटारसायकल चालवीत असल्याचे त्याने सांगीतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT