Jalna News : दोन दुचाकी चोर जेरबंद; दहा दुचाकी पकडल्या file photo
जालना

Jalna News : दोन दुचाकी चोर जेरबंद; दहा दुचाकी पकडल्या

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

Two bike thieves arrested; Ten bikes were caught

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील दुचाकी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत दोन आरोपींना शिर्डी येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातुन तब्बल ४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने तपास सुरू केला होता. ११ ऑगस्ट रोजी संतोष भाऊराव पाचरणे (रा. पानशेंद्रा, जि. जालना) यांची शाईन दुचाकी कणकेश्वर मंदिर परिसरातून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.

याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान सदर दुचाकी गणेश ऊर्फ संतोष शंकर शिंदे (रा. कालिकानगर, शिर्डी) आणि सौरभ विक्की रोजझारिओ (रा. शिर्डी) यांनी चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २६ सप्टेंबर रोजी शिर्डी येथून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत दोन्ही आरोपींनी आणखी एका साथीदारासह जालना शहरातील उढाण कॉम्प्लेक्स, लक्कडकोट तसेच परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून विविध ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सहाय्यक फौजदार रामप्रसाद पव्हरे, पोलीस अमंलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, कैलास खार्ड, रुस्तुम जैवाळ, ईरशाद पटेल, बाबा गायकवाड, संदीप चिंचोले, धीरज भोसले, वसंत धस, चालक अशोक यांनी केली.

शिर्डी येथुन ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतांकडुन दुचाकी चोरीचे इतरही गुन्हे उघउ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे जालना, छत्रपती संभा-जीनगर व परभणी जिल्हयातुन चोरीस गेलेल्या दुचाकी मुळ मालकांना मिळण्यास मदत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT