आष्टीः परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस असल्याची बतावणी करीत एका व्यक्तीकडून एक एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व रोख एक हजार लुटण्यात आले. या दोन तोतया पोलिसांना आष्टी पोलीसांनी पाठलाग करून पकडल्याची घटना गुरुवार ( 31 ऑक्टो) रोजी आष्टी येथे घडली.
या विषयी पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की , परतुर रोडने दोन व्यक्ति हे मोटरसायकलने आष्टी कडे येत असताना या दोन आरोपींनी आम्ही पोलिस आहोत असे आय कार्ड दाखवून हास्तूरतांडा येथील अनिक बुधाजी आढे (वय 60) वर्ष याच्या 1-1 तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या 1000 रुपये रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन इंगेवाड सह , अजित चाटे , गोपीनाथ कांदे , विनोद वाघमारे , सज्जन काकडे , पांढरे , सोनुने , ढाकने , शिंदे , रामदास शेळके, देवळे, पांढरपोटे पोलिसांनी तात्काळ आरोपींचा पाठलाग सुरु केला. मात्र आरोपी सुसाट मोटार सायकल ने जात होते. मोंढा भागात निवडणूक विभागाच्यावतीने उभारण्यात आलेल्या चेक पोस्ट वरून ग्रामसेवक जगन राठोड व सपोनि सचिन इंगेवाड यांनी पाठलाग सुरू केला.
चोरट्यांनी प्रथम सातोना मार्ग कार्हाळा कडे धुम ठोकली मात्र पोलिसांनी पुढे मार्ग बंद केल्याने ते लिंगसा- सेलगाव पिंपरी अकोली फुलवाडी असे पळाले शेवटी त्यांना ब्राह्मणवाडी ता परतूर शिवारात पोलीसांनी पकडले. त्यांची नावे मजुलुम नवाज रियासत अली शेख व बाकर अली अहमद अली ( इराणी ) दोन्ही (रा. परळी ता. परळी जि. बिड) आहेत. त्यांची मोटारसायकल (MH12T.E.3752) हिच्या विषयी संशय आल्याने याबाबत माहिती घेतली असता ती सिहंगड पुणे येथुन चोरी केलेली असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर यापुर्वीचे अनेक गुन्हे दाखल असुन या विषयी अधिक तपास आष्टी पोलीस करत आहेत.