Thrilling 'Shankar Pat' (bullock cart race) held at Vadigodri; prize money of one lakh rupees
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : गुरूदत्त जयंतीनिमित्त शुक्रवार, दि.२० रोजी सकाळी ७ वाजल्यापासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर शंकर पटाचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
या शर्यतीत प्रथम बक्षीस १ लाख १ हजार १११ रुपये, द्वितीय बक्षीस ७७ हजार ७७७ तर तृतीय बक्षीस ५५ हजार ५५५ रुपये असणार आहे. यावेळी मथुर १००१ चे मालक राहुल पाटील व करोडी छत्रपती संभाजीनगर येथील आदत किंगचे मालक लखन ११९७ हे आपल्या बैलांसह शर्यतीमध्ये सहभाग घेणार आहेत.
प्रवेश शुल्क १३०० रुपये आहे. चतुर्थ बक्षीस ४४,४४४ रु. पाचव्या क्रमांकाचे बक्षीस ३३,३३३ रु. सहाव्या क्रमांकाचे बक्षीस २२,२२२ रु. सातव्या क्रमांकाचे बक्षीस ११,१११ रु. असणार आहे. जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नियोजन समितीकडून करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वडीगोद्री यांचेही उपचार पथक शर्यतीच्या मैदानावर, उपस्थित राहणार आहे, अशी माहिती नियोजन समितीकडून देण्यात आली.