Jalna Rain : भोकरदन तालुक्यातील तीन मध्यम प्रकल्प १५ टक्क्यांत  File Photo
जालना

Jalna Rain : भोकरदन तालुक्यातील तीन मध्यम प्रकल्प १५ टक्क्यांत

जुलै महिना संपत आला, तरीही धरणे रिकामे; मोठ्या पावसाची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

Three medium projects in Bhokardan taluka at 15 percent

आन्वा, पुढारी वृत्तसेवा भोकरदन तालुक्यात जून महिना संपला जुलै महिन्याचे चार आठवडे उलटूनही पाझर तलाव, नदी नाले जलस्रोत तहानलेलेच आहेत. तालुक्याची तहान भागविणारे दानापूर येथील जुई धरण, शेलूद येथील धामणा धरण, वालसावंगी येथील पद्मावती धरणांत जुलैच्या शेवटच्या आठवड्याच्या स्थितीनुसार केवळ तीन मध्यम प्रकल्पांमध्ये १५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, उर्वरित सर्व पाझर तलाव कोरडेठाक आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यावर्षी पावसाच्या सुरुवातीला झालेला अनियमित आणि हलकासा पाऊस धरणांसाठी फारसा उपयोगी ठरलेला नाही. यंदा पावसाळ्याची सुरुवात उशिराने झाली असून आतापर्यंत समाधानकारक पर्जन्यमान न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मे महिन्यात काही भागांमध्ये झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता.

मात्र, जून महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांत पावसाने दडी मारली होती, भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जई, शेलूद येथील धामणा, पद्मावती येथील पद्मावती उन्हाळ्यात या धरणातील पाणीसाठ्यात घट झाली झोती. त्यामळे या तालुक्यातील काही गावांत पाण्याचे टँकर सुरू केले होते. मात्र, मे महिन्यात झालेल्या पावसामुळे जुई, धामणा आणि पद्मावती धरणांत काहीसे पाणीसाठ्यात वाढ झाली होती. त्यामुळे पाणीसंकट टळले होते. त्यानंतर जून व जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणे ओव्हरफ्लो होतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु अद्यापही धरणे रिकामी आहेत.

यंदा भोकरदन तालुक्यातील दानापूर जुई धरण १४, शेलूद धामणा धरण १५, वालसावंगी पद्मावती धरण १७ पाणी साठा उपलब्ध असून येणाऱ्या काळात जोरदार पाऊस न झाल्यास भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहेत.

दानापूर येथील जुई धरणावर भोकरदन शहरासह दानापूर, देहेड, वाकडी, कठोरा बाजार, सुरंगळी, वाडी, कल्याणी, करजगाव, मूर्तड, दगडवाडी, तळनी, भायडी, निंबोळा, मलकापूर, मनापूर, विरेगाव, बाभुळगाव, सिपोरा बाजार, वरुड, पिंपळगाव (रे.) या आदी गावाला या धरणातून पाणीपुरवठा होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT