Three accused who robbed an ice cream vendor finally arrested
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील मंठा रोडवर एका तरुण आईस्क्रीम विक्रेत्याचे अपहरण करून त्यास अमानुष मारहाण करीत जबरदस्तीने पैशांची मागणी करणाऱ्या तीन आर ोपींना अटक करण्यात तालुका जालना पोलिसांना यश आले आहे.
शहरातील मंठा रोडवर २२ जा-नेवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एका आईस्क्रीम विक्रेत्याला काही इसमांनी मारहाण करून जबरदस्तीने वाहनात बसवीत त्याचे अपहरण करून त्याला अज्ञातस्थळी नेले.
तेथे त्यास बेदम मारहाण करून फोनपेच्या माध्यमातून पैशांची मागणी केली जात असल्याची व पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली गेली. आरोपींनी फोन पे वरून पैसे घेतल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन मोबाईल बंद केला होता.
गंभीर मारहाण झालेल्या आईस्क्रीम विक्रेत्यास उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी नवरत्न प्रकाश पुरी (वय १९, रा. भिलवाडा राजस्थान, सध्या रा. गायत्रीनगर, जालना) यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार करीत होते. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना जालन्यातुन तर एका आर- ोपीस पुणे-अहिल्यानगर सिमेवरील एका हॉटेलमधुन ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, फिर्यादीचा मोबाईल, फोन पे व रोख रक्कम मिळून ६ हजार ९०० रुपये, दोन लाकडी काठ्या, आईस्क्रीम कटर, नट उघडण्याचा पान्हा व दोरी असा मुद्देमाल तालुका जालना पोलिसांनी आरोपींकडुन जप्त केला.