रिक्षात बसवून पैसे चोरणारे जेरबंद file photo
जालना

jalna crime news : रिक्षात बसवून पैसे चोरणारे जेरबंद

८० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

पुढारी वृत्तसेवा

Thieves Who Rob Passengers After Luring Them into Rickshaws Apprehended

जालना, पुढारी वृत्तसेवा : ज्योठ नागरिकांसह प्रवाशांना रिक्षात बसवून त्यांच्याजवळील पैसे चोरणाऱ्या रिक्षा चालकास जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सदर रिक्षा चालकाकडून ८० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथील एकनाथ रामभाऊ बोडखे हे २९ मार्च रोजी जालना येथे आले होते. त्यांना मंठा चौफुली परिसरातील एका खासगी हॉस्पिटलमधे जायचे असल्याने ते मंठा चौफुलीकडे जाणाऱ्या रिक्षात बसून मंठा चौफुलीकडे जात असताना रिक्षा चालक व रिक्षा मधील अज्ञात इसमांनी त्यांच्या खिशातील ५ हजार ८५० रु. रोख व फिर्यादीच्या पत्नीचे आधारकार्ड चोरी केले.

या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात रिक्षा चालकासह ३ इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे सोपविण्यात आला होता. सदर गुन्हयात वापरण्यात आलेल्या रिक्षाचा शोध ट्राफिक सी.सी.टी.व्ही. द्वारा तसेच गोपनीय माहिती घेतला असता सदर रिक्षाचा क्र. एम एच २१ ०६६८ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर रिक्षाचालक हा शेख अस्लम शेख नसीर (रा. इंदिरानगर जालना) यास पोलिसांनी ताब्यात घेउन चौकशी केली असता सदर गुन्ह्यातील फिर्यादीने त्याच्या रिक्षा मधून प्रवास केल्याची कबुली त्याने दिली.

यांनी केली कारवाई

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, सतीश श्रीवास, रमेश काळे, सर्व स्था.गु.शा. जालना यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT