There has been a decline of more than half in the number of traps laid by the Anti-Corruption Bureau
जालना, पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या दहा वर्षात उतरत्या क्रमाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. ही बाब लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालावरुन स्पष्ट झाली आहे.
गेल्या १० वर्षांच्या आकडेव ारीवर नजर टाकल्यास, २०१४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये लाचख ोरीच्या (सापळा) घटनांमध्ये लक्षणीय घट झाली असून भ्रष्टाचाराचा ग्राफ खाली घसरत असल्याचे दिसून येत आहे. एसीबीने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अहवालानुसार, २०१४ मध्ये राज्यात सर्वाधिक म्हणजेच १२४५ सापळा गुन्ह्यांची नोंद झाली होती.
मात्र, २०२४ मध्ये ही संख्या ६८३ पर्यंत खाली आली आहे. म्हणजेच गेल्या १० वर्षांत लाचख ोरीच्या तक्रारी आणि कारवाईत जवळपास ५० टक्क्यांनी घट झाली आहे. २०१५ मध्ये देखील १२३४ गुन्हे नोंदवले गेले होते, त्यानंतर ही संख्या सातत्याने कमी होत गेली आहे.
केवळ लाच घेणेच नाही, तर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता (अपसंपदा) जमा करणाऱ्यांविरुद्धही विभागाने जरब बसवली आहे. २०१४ मध्ये अपसंपदेचे ४८ गुन्हे दाखल होते, जे २०२४ मध्ये ३१ झाले आहेत. अन्य भ्रष्टाचार प्रकरणांतही मोठी घट झाली असून २०२४ मध्ये केवळ ७ गुन्हे नोंदवले गेले आहेत. एकूणच डिजिटल व्यवहार आणि वाढत्या जनजागृतीमुळे भ्रष्टाचाराला लगाम बसत असल्याचे मत आहे.
२०२५ मध्ये ही ६६९ सापळे लावले
दरम्यान, २०२५ या वर्षात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ६६९ यशस्वी सापळे लावले. यात सुमारे ६८२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात अपसंपदाचे ९ व इतर भ्रष्टाचाराचे ४ प्रकरणे आहेत. सापळ्यांची संख्या सातत्याने घसरत असल्याचे दिसून येत आहे.