Jalna Drought : दुष्काळाच्या झळा अन् बैठकांचा पाऊस file photo
जालना

Jalna Drought : दुष्काळाच्या झळा अन् बैठकांचा पाऊस

अंबड तालुक्यातील दुष्काळावर मान्यवरांचे विचारमंथन

पुढारी वृत्तसेवा

The scorching heat of drought and a downpour of meetings

राजेंद्र कळकटे

अंबड : अंबड तालुक्यात पडलेल्या अत्यल्प पावसामुळे हिवाळ्यातच दुष्काळाची काळाची धग धग जाणवू जाणवू लागली आहे. या पार्श्वभुमीवर प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी दुष्काळाच्या प्रश्नावर बैठकांचा धडाका उडवून दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या बैठकानंतर प्रत्यक्ष दुष्काळावर कोणत्या उपाययोजना केल्या जातात हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.

तालुक्यात यावर्षी पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याने दुष्काळाच्या झळा हिवाळ्यातच तीव्र झाल्या आहेत. तालुक्यातील दुष्काळ निवारणासाठी प्रत्यक्ष ठोस उपाययोजना करण्या ऐवजी शासकीय बैठकांमध्येच योजनांचा पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. अंबड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ सर्कलपैकी चार सर्कल घनसावंगी विधानसभा मतदारसंघात, तर अंबड नगर परिषदेसह उर्वरित चार सर्कल बदनापूर विधानसभा मतदारसंघात येतात.

त्यामुळे तालुक्याच्या विविध भागांना दोन आमदारांचे प्रतिनिधित्व मिळते. आमदार हिकमत उढाण आणि आमदार नारायण कुचे यांनी अलीकडेच आपापल्या मतदारसंघातील गावांच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अंबड तहसील कार्यालयात स्वतंत्र बैठका घेतल्या.

तालुक्याला जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे आणि परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बंडू जाधव यांचेही प्रतिनिधित्व आहे. दोन आमदार, दोन खासदार असूनही दुष्काळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीला अपेक्षित गती का मिळत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टँकर लॉबी, कंत्राटदारांचीही लगबग

दुष्काळाची तीव्रता वाढत असताना टँकरची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे टँकर पुरवठ्याशी संबंधित मंडळी आतापासूनच सक्रिय झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे जलसंधारण विभागामार्फत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेतली जाण्याची शक्यता असल्याने कंत्राटदारांचीही लगबग सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT