जालना, पुढारी वृत्तसेवाः इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अॅपवर कोयत्यासह व्हिडीओ तयार करून लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली.
जालना जिल्हयात अवैध धारदार शस्त्रे तलवार बाळगणाऱ्यांसह सोशल मिडीया अँपवर अवैध धारदार शस्त्रे तलवार बाळगुन व्हिडीओ अपलोड करणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सुचना पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व पथकास दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक पंकज जाधव, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार करुन कारवाई करण्याबाबत सुचना केल्या.
सोशल मिडीया इंन्स्टाग्राम अँपवर कोयतासह व्हिडीओ तयार करुन वायरल करीत लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एक विधीसंघर्षग्रस्त बालकासह सचिन शामराव लोखंडे (रा. दौलतपूर बरड जाफ्राबाद) यांच्या ताब्यातून एक धारदार कोयता, एक फायटर व एक मोबाईल आठ हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जाफ्राबाद येथून जप्त करण्यात आला. आरोपी विरुध्द जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षकी. अजय कुमार बन्सल, इ अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रस्तुम जैवाळ, जगदीश बावणे, सागर बाविस्कर, दिपक घुगे यांनी केली.