The issue of additional teachers in the state is serious
जालना, पुढारी वृत्तसेवा : राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर असुन जिल्हयात अतिरिक्त शिक्षकांना सामावुन घेण्यासाठी रिक्त जागा नसल्याने या समायोजन प्रकियेला स्थगिती देण्याची मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील संचमान्यते प्रमाणे अतिरिक्त शिक्षक समायोजन ५ डिसेबर पूर्वी करण्यावावतचे निर्देश शिक्षण संचनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांनी २० नोव्हेंबरच्या पत्रान्वये दिले आहे. मात्र ही संचमान्यता सदोष असल्याने ती अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया शिक्षकात उमटत आहे. २०२४ २५ मध्ये झालेल्या संच मान्यतेत भौतिक सुविधा व इतर तांत्रिक बाबीने संच मान्यतेमध्ये त्रुटी असल्याची तक्रार राज्यातील अनेक शाळेने केली आहे मात्र या त्रुटीचे निरासन झाले नसल्याने अनेक शाळातील संच मान्यता चुकीच्या पद्धतीने दिलेल्या आहेत.
शासनाने १० पटा खालील शाळा या इतर जवळच्या शाळेत एकत्रीकरण प्रक्रियेला सुरुवात केली आहे. परिणामी येथिल शिक्षक अतिरिक्त होत आहेत. शिवाय २० पटा खालील शाळेत एकच शिक्षक देऊन दुसऱ्या शिक्षकाचे समायोजन शिक्षकांची गरज असलेल्या शाळेवर करण्यात येत आहे वामुळे शिक्षकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत राज्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळेत आधार नसलेले किंवा आधार वैद्यता नसलेले विद्यार्थी काही प्रमाणात आहेत.
आधार वैधता दुरुस्ती बंद असल्याने अशा विद्यार्थ्यांचे नावे व सदर विदयार्थी दररोज शाळेत असला तरी तो संच मान्यतेसाठी ग्राहय धरला जात नाही. २०२५ मध्ये शिक्षकांच्या ऑनलाईन चदली मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे. अतिरिक्त पदी असलेल्या शिक्षकांच्या बदली पदी शिक्षकांची बदली व्हायला नको होती. परिणामी या अतिरिक्त पदावर शिक्षक बदलीने शाळेत कार्यरत शिक्षक हा अतिरिक्त झालेला आहे.
तातडीने यावर उपाययोजना करण्यासाठी होऊ घातलेली समायोजन प्रक्रिया थांबवुन सदर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यापूर्वी तातडीने राज्यभर मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी हि पदोन्नती प्रक्रिया राबवावी व या अतिरिक्त शिक्षकांना न्याय द्यावा अशी विनंती प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष राजगुरू, संजय हेरकर व अमोल तोंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यामध्ये साधारण दहा ते बारा हजार शिक्षक हे अतिरिक्त ठरत आहेत. बहुतांश जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्यासाठी रिक्त जागा जिल्हा परिषद मध्ये उपलब्ध नाहीत .त्यामुळे तातडीने पदोन्नती प्रक्रिया राबवून शिक्षकांचे रिक्त जागा निर्माण करून या रिक्त जागी अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेणे गरजेचे आहे.