The election campaign is in its final stage
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना महापालीका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असुन उमेदवार व समर्थकांनी प्रभागात प्रचाराच्या रॅली काढत तसेच मतदारांच्या घरोघर जावुन गाठी-भेटी घेत मतदान करण्याचे अवाहन केले.
जालना शहर महापालीकेचा प्रचार अंतिम टप्प्यात शिगेला पोहचला आहे. रविवारी नौकरी करणारे घरीच सापडत असल्याने हा योग साधत विविध पक्षासह अपक्ष उमेदवारांनी प्रभागात मोठ-मोठ्या रॅली काढत प्रचाराचा धुराळा उडवुन दिल्याचे पहावयास मिळाले. रिक्षासह चारचाकी वाहनांवर ध्वनीक्षेपक लावुन मतदानाचे अवाहन करतांना उमेदवार व समर्थक दिसु आले. या निवडणुकीच्या प्रच-ारात विकासाचा मुद्दा मागे पडल्याचे दिसुन आले. ठोकळेबाज विकासाचे अवाहन करीत उमदेवार प्रभागात मतदारांना लुभावितांना दिसुन आले.
कार्यकर्त्याच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत नेत्यांचा कस लागल्याचे पहावयास मिळत आहेत. विविध पक्षाचे राजकीय नेते पायाला भिंगरी बांधुन विविध प्रभागातील प्रचारात सहभागी होतांना दिसत आहे.
कार्यकर्त्यांचा प्रचार करतांना नेत्यांचे लक्ष घरच्या उमेदवारांच्या प्रभागाकडे अधिक असल्याचे दिसत आहे. महापौर पदाचे आरक्षण अद्याप जाहीर न झाल्याने हा मुद्दाही आगामी काळात कळीचा ठरणार आहे. महापालीका सदस्य पदाच्या निवडणुकीनंतर महापौर कोणाचा हे ठरणार आहे. यात कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यास अपक्ष उमदेवारांचा भाव वधारणार आहे. भाजपा व शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते महापौर पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकत्र येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
२९१ मतदान केंद्र
महापालीका निवडणुकीत सर्वच पक्षाचे नेते विजयाचा दावा करीत असले तरी निवडणुकीत मतदार कोणाच्या पारड्यात मतदान करणार हे १५ जानेवारी रोजी ठरणार आहे. महापालीकेच्या ६५ जागांसाठी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी २९१ मतदान केंद्र राहणार असुन ४५३ उमेदवारांचे भवितव्य जालन्यातील २ लाख ४५ हजार ९२९ मतदार ठरविणार आहे.