Tembhurni Water Supply pudhari photo
जालना

Jalna News : टेंभुर्णी ग्रामपंचायतकडून अशुद्ध पाणीपुरवठा

नागरिकांच्या आरोग्याला धोका, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायतीकडून नागरिकांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामस्थांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणे अपेक्षित असताना अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

पाणी हे प्रत्येक नागरिकाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. मात्र, पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता योग्य नसेल, तर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा करण्यापूर्वी पाण्याची नियमित तपासणी करणे, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे तसेच जलवाहिन्यांची देखभाल करणे आवश्यक आहे. मात्र, टेंभुर्णीमध्ये अस्वच्छ पाणीपुरवठ्याबाबत तक्रार समोर आल्याने ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गावाला पाणी पुरवठा करण्यात येणारी गावातील अंतर्गत पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटल्याने नालीतील घाण पाणी पाइप लाइनमध्ये जाऊन तेच पाणी घरापर्यत पोहचत आहे. ग्रामपंचायतकडे नागरिकांनी तक्रार करून फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून गावातील अशुध्द पाण्याचा समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे.

गावातील अशुध्द पाणीपुरवठ्यासंदर्भात ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा ग्रामसेवक जगदीश आढाव यांच्याशी अनेकदा संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.यावरून प्रशासक गावाच्या समस्येबाबत सर्तक राहत असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने या तक्रारीची तातडीने दखल घेऊन पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करावी, दोषी आढळणाऱ्या बाबींवर योग्य ती कार्यवाही करावी आणि नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करावा.
मनीष कुलथे, रहिवासी टेंभुर्णी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT