Electricity Meters : शहरात वीज मीटरमध्ये फेरफार; महावितरणच्या पथकाची कारवाई file photo
जालना

Electricity Meters : शहरात वीज मीटरमध्ये फेरफार; महावितरणच्या पथकाची कारवाई

२७ हजार ८९० रुपयांची वीज चोरी उघड; सहा जणांविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Tampering with electricity meters in the city; action taken by MSEDCL team

जालना, पुढारी वृत्तसेवा : करणाऱ्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित असतानाही मीटरच्या वायरिंगमध्ये अनधिकृत फेरफार करून वीज चोरी ६ जणांविरुद्ध महावितरणच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना जालन्यातील संजय नगर, मिल्लत नगर आणि देहकरवाडी परिसरात सप्टेंबर २०२६ मध्ये केलेल्या तपासणीत एकूण २७ हजार ८९० रुपयांची वीज चोरी उघडकीस आली आहे.

महावितरण कंपनीच्या शहर शाखा क्रमांक १ (जालना) येथील सहाय्यक अभियंता संजय अण्णाजी गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, थकबाकी न भरल्यामुळे स्वयंचलित तात्पुरता वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांच्या घरी वीज सुरू आहे की बंद, याची तपासणी मोहीम राबवण्यात आली. ४ ते २८ सप्टेंबर दरम्यान सहायक अभियंता संजय गव्हाणे यांनी वीज कंपनीचे तांत्रिक कर्मचारी विद्युत सहायक जुनेद जमील सय्यद व वरिष्ठ तंत्रज्ञ कल्याण नामदेव वीज चोरी गुन्हा आहे.

शिंदे यांच्यासह संबंधित ठिकाणी स्थळ पाहणी केली. वीज चोरी केल्याप्रकरण सहाय्यक अभियंता संजय गहाणे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पंचमाना करून वीजपुरवठा बंद

तपासणीत मीटरच्या इनकमिंग व आउटगोइंग टर्मिनलचे वायर काढून किंवा इन्स्युलेशन काढून अतिरिक्त वायरद्वारे थेट स्विच बोर्ड व विद्युत उपकरणांना अनधिकृत जोडणी देऊन वीज वापर सुरू असल्याचे आढळून आले. पथकाने पंचनामा करून संबंधित वीज पुरवठा बंद केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT