Ration Shop Grain : राशन दुकानांमधून निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा file photo
जालना

Ration Shop Grain : राशन दुकानांमधून निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा

महागाईच्या काळात आन्वा येथे गरिबांच्या ताटात खराब धान्य

पुढारी वृत्तसेवा

Supply of poor-quality food grains from ration shops

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : गोरगरीब कुटुंबांना महागाईच्या काळात आधार मिळावा, यासाठी शासनाकडून सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत राशनचे धान्य पुरविले जाते. मात्र, या धान्याचा दर्जाच निकृष्ट असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गरिबांच्या ताटात चांगल्या दर्जाचे धान्य पोहोचण्याऐवजी खराब धान्य मिळत असेल, तर शासनाच्या योजनेचा लाभ नेमका कोणत्या स्वरूपात मिळत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत गोरगरीब नागरिकांना शासनाकडून मोफत किंवा सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र, काही राशन दुकानांमधून लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याच्या तक्रारी समोर येत असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी मिळणाऱ्या धान्याचा दर्जाच खराब असेल, तर शासनाच्या योजनेचा नेमका लाभ कोणाला मिळणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

राशन दुकानातून मिळणाऱ्या तांदूळ, गहू आणि ज्वारीचा दर्जा समाधानकारक नसल्याच्या तक्रारी काही लाभार्थ्यांकडून केल्या जात आहेत. धान्याची गुणवत्ता, स्वच्छता आणि खाण्यायोग्य स्थिती याबाबत नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे बोलले जात आहे. महागाईच्या काळात अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्यावर अवलंबून असतो. अशा परिस्थितीत निकृष्ट धान्य मिळणे म्हणजे गरजू कुटुंबांच्या अडचणीत आणखी भर पडण्यासारखे आहे.

नियमित तपासणी होईना

शासनाकडून गरीब व गरजू कुटुंबांसाठी विविध योजना राबविल्या जात असताना, प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत दर्जेदार धान्य पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. धान्याचा दर्जा तपासण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असताना, पुरवठा होणाऱ्या धान्याची नियमित तपासणी केली जाते का, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

दखल घ्यावी

गोरगरीब नागरिकांच्या हक्काचे धान्य त्यांना योग्य दर्जात मिळावे, यासाठी संबंधित पुरवठा विभागाने राशन दुकानांची अचानक तपासणी करावी, धान्याच्या गुणवत्तेची पडताळणी करावी आणि तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT