Manoj Jarange Patil allegations Sunil Tatkare Vijaykumar Ghadge Attack
वडीगोद्री : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि.२१) केला आहे.
अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला शंका आहे की हा हल्ला तटकरे यांनीच घडवून आणला आहे. यातून त्यांच्या मनातील मराठा द्वेष स्पष्टपणे दिसून येतो. त्यांनी पुढे सांगितले, विजय घाडगे हे शेतकऱ्यांचे लेकरू आहे. जर ते शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेले, तर त्यांना मारहाण केली जाते. हे आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन केले की, अशा प्रकारच्या हल्लेखोरांना केवळ पदावरूनच नव्हे, तर पक्षातूनही हाकलून द्यावे. अशा लोकांना मोठ्या पदांवर ठेवणे चुकीचे आहे. याचा फटका पक्षालाही बसू शकतो.
दरम्यान, छावा संघटनेचे विजय घाडगे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर कृषिमंत्री कोकाटे यांच्या विरोधात प्रतिकात्मक कृती म्हणून पत्ते फेकले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजय घाडगे यांच्यावर आणि इतरांवर मारहाण केली. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे
दरम्यान, मृत महादेव मुंडे यांच्या पत्नीने सांगितले की, ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळावा यासाठी ते रस्त्यावर उतरणार आहेत. आज त्या विजय घाडगे यांना भेटण्यासाठी लातूर आणि परळीला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.