जालना

पपई, टरबूज, खरबुजाची बाजारात धूम

पालेभाज्यांचे दर स्थिर; कोथिंबीर, मेथीची आवक वाढली

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (दि. २५) शेतीमालाची मोठी आवक झाली. फळांमध्ये आंबा, पपई आणि टरबूजाला मोठी मागणी दिसून आली, तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर आणि मेथीच्या जुड्यांनी बाजार गजबजला होता. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर फळांचे दर तेजीत असल्याचे चित्र आहे.

बाजार समितीने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज २५ एप्रिल रोजी तब्बल २८९ क्विंटल आंब्याची आवक झाली असून, त्याला सरासरी १६०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. उन्हाळ्याचा मेवा मानल्या जाणाऱ्या टरबूज आणि खरबुजाचीही मोठी आवक झाली आहे. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरच्या १८५० जुड्यांची आवक झाली असून सरासरी ५०० रुपये दराने विक्री झाली. बटाटा आणि कांद्याची आवकही समाधानकारक असून बटाट्याला ६५० रुपये, तर कांद्याला ५०० रुपये सरासरी भाव मिळाला आहे. एकूणच फळभाज्यांच्या बाजारात आज कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे पाहायला मिळाले.

उन्हामुळे लिंबाला वाढती मागणी; आले आणि लसणाचे भावही कडाडले

वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे जालना बाजारपेठेत लिंबाच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. आज बाजार समितीत लिंबाला सरासरी ८००० रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी भाव मिळाला. लिंबासोबतच आले आणि लसणाच्या दरातही वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आजच्या लिलावात आल्याला ३००० रुपये तर लसणाला ४००० रुपये सरासरी भाव मिळाला. भाजीपाल्यामध्ये शेवग्याला ३५०० रुपयांचा दर मिळाला असून हिरव्या मिरचीचीही ४६,९०० रुपयांची मोठी उलाढाल झाली. दुसरीकडे वांगी, टोमॅटो आणि फ्लॉवरचे दर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे राहिले आहेत. टोमॅटोला सरासरी ८०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT