Jalna News : शेकडो हेक्टवरील उसाचे पीक धोक्यात  File Photo
जालना

Jalna News : शेकडो हेक्टवरील उसाचे पीक धोक्यात

अंबड, घनसावंगी तालुक्यातील ऊस पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव

पुढारी वृत्तसेवा

Sugarcane crop on hundreds of hectares is at risk

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यात ऊसावर करपासहश अज्ञात रोगाबरोबर रसशोषक किडीचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. यात ऊस पिकाचे शेकडो एकर क्षेत्र या रोगाला बळी पडले आहे. अज्ञात रोगाचे निदान होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. या रोगाची लक्षणे म्हणजे ऊस पिवळर होऊन उसाची वाढ खुंटणे अशी करपासदृश आहेत.

अंबड तालुक्यात सर्वत्रच या रोगाचा प्रादुर्भाव असला तरी वडीगोद्री सह नालेवाडी, अंतरवाली सराटी, महाकाळा, पाथरवाला खुर्द व बुद्रुक, घुंगर्डे हादगाव आदी परिसरात या रोगाचा प्रादुर्भाव मोठा झाल्याचे आढळून येते. सद्यस्थितीमध्ये ऊसावर पांढरी माशीसदृश रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील वर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. डाव्या कालव्याला मुबलक पाणी असल्याने उसाची वाढही जोमदार होत होती. मात्र मागील एक महिन्यापासून उसावरील अज्ञात रोगाने पाने पिवळी पडून करपा सदृश्य रोगाने थैमान घातले आहे.

त्यामुळे ऊसाची वाढ खुंटली आहे. अज्ञात रोगाच्या या शेकडो एकर क्षेत्रावरील ऊस पीक धोक्यात आले आहे. या नवीन संकटाने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.

सद्य परिस्थितीत उसावर रसश प्रदूर्भावाने ोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. उसाच्या पानाच्या मागील बाजूस पांढरे व तपकिरी रंगाचे डाग दिसून येत आहेत. अज्ञात किडी पानातील रस शोषण करतात त्यामुळे ऊसाची पाने निस्तेज होतात व प्रथम पिवळी पडून कालांतराने ती करपू लागतात.

उसावरील करपा सदृश्य रोग आटोक्यात आलेला नाही. तो दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परिणामी शेतकऱ्यांना याचा फटका बसणार असं उत्पन्नात मोठी घट होणार आहे. यावर कृषी विभाग व साखर कारखान्यांनी रोग नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. -
पांडुरंग गटकळ, जिल्हा सचिव, स्वाभिमानी शेतकरी संघटना
मागील काही वर्षात उसाला मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मीही चार एकर उसाची लागवड केली आहे. मात्र अज्ञात रोगामुळे ऊस करपू लागला आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
- उमेश बर्वे, ऊस उत्पादक शेतकरी, दह्याळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT