Strong condemnation of attack on Chief Justice
जालना, पुढारी वृत्तसेवा : भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भुषण रामकृष्ण गवई यांच्यावर झालेल्या हल्लयाच्या घटनेने देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेचा जालना जिल्हा वकील संघाने तीव्र शब्दांत निषेध नोंदवित भारताचे राष्ट्रपती यांचेकडे जिल्हाधिकारी मार्फत अक्रोश अर्ज सादर केला आहे.
बुधवार दि. ०८ रोजी दुपारी दोन वा. च्या सुमारास निवेदन दिले. वकील संघाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दि. ६ ऑक्टोबर रोजी भारताचे सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला हा देशाच्या न्यायव्यवस्थेवर केलेला भ्याड आणि जातीवादी मानसिकतेतून प्रेरित हल्ला आहे. न्यायदेवतेवर हात उचलणाऱ्या तथाकथित वकीलाची सनद तात्काळ रद्द करून त्याच्यावर अट्रॉसिटी, मानहानी आणि देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
जालना जिल्हा वकील संघाने या माध्यमातून न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकवण्यासाठी आणि न्यायदेवतेचा सन्मान राखण्यासाठी संपूर्ण देशाने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. यावेळी अॅड. सोहेल सिद्दिकी, अॅड. शिवाजीराव आदमाने, अॅड. किशोर राऊत, अॅड. माणिकराव बनसोडे, अॅड. झेड बी मिसळ, अॅड. आयज सुभानी अॅड उमर परसूवाले, अॅड. वैभव खरात अॅड. महेश धन्नावर, अॅड इंगोले, अॅड, इरफान बिरादार, अॅड. भालमोडे, अॅड. ठाकूर अॅड विजय हिवाळे अॅड. चव्हाण सर अॅड. विलास देशमुख अॅड पद्युख साहेब अॅड. निखिल तनपुरे अॅड. स्वाती जाधव, अॅड. अश्विनी चव्हाण, अॅड. मनोरमा महालकर, अॅड. राम नितनौवरे आदींची उपस्थिती होती.
भारताचे सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला हा देशाच्या न्यायव्यवस्थेवर केलेला भ्याड आणि जातीवादी मानसिकतेतून प्रेरित हल्ला आहे. न्यायदेवतेवर हात उचलणाऱ्या तथाकथित वकिलाची सनद तत्काळ रद्द करून त्याच्यावर अॅट्रॉसिटी, मानहानी आणि देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.